आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीही नाही मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक आहे असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी आक्रमक होत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारपुढे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना, तरुणांना इतर सवलती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
सारथी सुरु झाली. पण सारथी तारादूत आहे. मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचवणारं एक माध्यम, ४०० जण होते, ते कुठे आहेत? UPSC करायला दिल्लीला जाण्यासाठी शिष्यवृत्ती होती, ती कुठे आहे? विदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीची फेलोशिप कुठे आहे? पण सरकार सकारात्मक आहे. हॉस्टेल सुरु केले? अर्धी फी आकारणार, केलं का?, असे अनेक सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल येत नाही, तोवर इतर सवलती तरी समाजाला देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोणत्या १४ मागण्या मान्य झाल्या हे एकदा समाजासमोर मांडण्यांची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा- चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना दिलं जाहीर आव्हान, म्हणाले…

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, दोन दिवसांचं अधिवेशन नाही, पुनर्याचिका आत्ता दाखल केली, मागास आयोगाचं कामकाज नाही, मराठा नव्याने मागास ठरवणं नाही, मराठा मागास ठरेपर्यंत सवलती नाही, तरी कोविड आहे म्हणून आंदोलन करु नका सांगायचं. पण आम्ही आमचं राजकारण सुरु ठेवणार, राऊत दोन तास भेटणार उद्धव ठाकरेंना, मग पवार साहेबांना भेटणार, या सगळ्यांना डेल्टा नाही.