‘शिवसंग्राम’साठी मेटेंचा बीड मतदारसंघावर दावा

महायुतीतील घटकपक्ष शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी शिवसेनेकडे असलेला बीड विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामला सोडावा, अशी मागणी केली आहे.

महायुतीतील घटकपक्ष शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी शिवसेनेकडे असलेला बीड विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामला सोडावा, अशी मागणी केली आहे. जिल्हय़ात सेनेकडे हा एकमेव मतदारसंघ असल्यामुळे, तसेच सेनेला वातावरण पूरक असताना या मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा सुरूझाल्याने शिवसनिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हय़ात भाजपकडे ५ व सेनेकडे बीड हा एकमेव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे सेनेचे राज्यमंत्री सुरेश नवले यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी सेना सोडल्यानंतर तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील धांडे यांनाही एकवेळ संधी मिळाली. आता प्रा. नवले काँग्रेसमध्ये, तर प्रा. धांडे मनसेमध्ये आहेत. या वेळी या मतदारसंघातून सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप प्रमुख दावेदार आहेत, मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामचे आमदार मेटे यांना गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीत घेतले. महायुतीत मेटे यांनी बीड मतदारसंघ शिवसेनेकडे मागितला आहे. महायुतीच्या जागावाटप बठकीतही मेटे यांनी शिवसंग्रामला राज्यातून काही जागा मागितल्या आहेत. त्यात बीड मतदारसंघाचा समावेश आहे.
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार राजेंद्र जगताप वा आमदार मेटे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Claim on beed constitution of vinayak mete for shivsangram

ताज्या बातम्या