हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग:  राज्यात सत्ताबदल होताच, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला आहे. गेली अडीच वर्षे निधीसाठी धडपडणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची झोळी राज्य सरकारने भरण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेंचे समर्थक असणाऱ्या महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात २५२ कोटींची कामे मंजूर झाली आहेत. यापूर्वी ४० कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती.

Union Home Minister Amit Shah will visit Akola on March 5 to review five constituencies in Vidarbha
लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…
swabhimani shetkari sanghatana marathi news, manoj jarange patil lok sabha election marathi news
मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी; स्वाभिमानीचा पाठिंबा जाहीर
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
Jharkhand mp geeta kora
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का; झारखंडमधील एकमेव खासदार गीता कोरा यांचा भाजपात प्रवेश, कारण काय?

शिवसेनेतील ४० आमदार बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. राज्यात भाजपच्या मदतीने या बंडखोर गटाने सत्ताही स्थापन केली आहे. या सत्तेची फळ आता आमदारांना चाखायला मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने बंडखोर आमदारांची झोळी विकास निधीने भरण्यास सुरुवात केली आहे.

अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात राज्य सरकारने तब्बल २५२ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व कामे एकटय़ा मेरिटाइम बोर्ड विभागातील आहेत. यात अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील जेटी आणि बंदरे विकासकामांचा समावेश आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी टर्मिनल येथे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी ७ कोटी ९० लाख, आगरदांडा येथील जु्न्या जेटीच्या दुरुस्तीसाठी ३ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तर अलिबाग तालुक्यातील आक्षीसाखर येथे जेट्टी, पोचरस्ता, गाळ काढणे, तत्सम सुविधा पुरवण्यासाठी १२० कोटी, शहापूर येथे जेट्टीचे बांधकाम ६० लाख, थळ येथील जेट्टीची दुरुस्ती ७ कोटी, मोरापाडा स्लोपिंग रॅम्पसाठी दीड कोटी, रेवस बंदर ७ कोटी, मांडवा बंदर प्रवासी सुविधा ५ कोटी ९० लाख, वरसोली दगडी बंधारा दुरुस्ती, जेट्टीपर्यंत जाणारा रस्ता आणि गाळ काढणे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यापूर्वी अलिबाग आणि मुरुड नगरपालिका हद्दीतील कामांसाठी २० कोटी रुपयांच्या निधीची कामे मंजूर करण्यात आली होती. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे आमदार निधी मिळत नाही म्हणून ओरडत होते त्यांच्या मतदारसंघात सत्ताबदल होताच निधीचा ओघ सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.