Nagpur Winter Session 2023 Updates, 07 December 2023: आजपासून (७ डिसेंबर) नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी विविध पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे या अधिवेशनात यावर काही निर्णय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटात असतील? याबाबत विविध तर्क लावले जात होते. नवाब मलिक यांनीही यावर कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती. पण आता मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…
Assembly Winter Session 2023 Nagpur Updates: नागपूर येथील हिवाळी अधिवेशानासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
या कृतीने त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे.
११४ प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे १०० टक्के गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर छगन भुजबळ यांना बघतो, असा थेट इशारा दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती.
वर्धा : कोंबड्यांचा वापर जुगारासाठी करणे चांगलेच भोवले. समुद्रपुर तालुक्यातील शिवणी गावात कोंबड्यांचा जुगार भरल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि लगेच धाड पडली. जुगार खेळणाऱ्या निलेश नागपुरे, अतुल पवार, अनिकेत पवार, शंकर भोसले, रजनीकांत पवार, राहुल राऊत या परिसरातील युवकांना अटक करण्यात आली. अवैध जुगार अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली आहे. जुगारअड्ड्यावरून सहा कोंबडे, नऊ दुचाकी व रोख असा एकूण ७ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाणेदार संतोष शेगावकर व चमूने ही कारवाई केली.
ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धान, कापूस, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तेथील शेतकर्यांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील, आमदार आशिष जयस्वालही फडणवीसांबरोबर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत समिती अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहेत.
पुण्यासारख्या महानगरात पाण्याची एवढी गंभीर परिस्थिती असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी स्वतः अनुभवले.
नागपूर: अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात मांडली. सविस्तर वाचा...
यवतमाळ: अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीक विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना ३५, ५०, ९० रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
बर्मुडा पॅन्टपासून, सरबत आणि बुद्धीबळ पट आणि गोड पदार्थही मिळणार. पेढा- बर्फी आणि एक किलोच्या केकला मनाई.
नागपूर: नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांना त्यांनी भेटी दिली.
जासई ते गव्हाण मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी २००५ ला संपादीत करण्यात आल्या आहेत.
बुलढाणा: बुलढाणा मार्गावरील रोहणा (ता खामगाव) गावात एकाच जातीच्या दोन गटात झालेल्या वादाचे भीषण घटनेत पर्यवसन झाले.
नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कधी काळी ‘हुरडा पार्टी’ अधिवेशन संबोधले जायचे. सभागृहात परस्परांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सभागृहाबाहेर पडल्यावर मात्र ऐकमेकांचे मित्र असल्यागत वागत. कालांतराने यात बदल झाला.
चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
नागपूरः भाजपा आणि काँग्रेस पक्षातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते सध्या वेगवेगळ्या मुद्यांवरून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा नेते आशिष शेलार विधिमंडळ परिसरात अमोरासमोर आले.
फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुंतवणुकदारांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
डोंबिवली येथील एमआयडीसी भागातील पाॅलियुरोथिन कंपनीत प्रशासन, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका रासायनिक पिंपाचा स्फोट होऊन रविवारी चार कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी कंपनी प्रशासन आणि ठेकेदारा विरूध्द मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजू राठोड, कबीर भोईर, सुमीत राय, अभिषेक शाहू अशी गंभीर भाजलेल्या कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी या कंपनीतील एक नियंत्रक ठेकेदार दीपक म्हात्रे, व्ही. सी. एम. पाॅलियुरोथिन कंपनी प्रशासना विरूध्द कामगार कबीर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
ज्वलनशील पदार्थ सुरक्षितरित्या न ठेवता निष्काळजीपणा केल्यामुळे कामगारांना दुखापत झाली, असा ठपका ठेवत पोलिसांनी कंंपनी अधिकारी, ठेकेदारा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील जुन्या आदिवासी पाड्यात रस्ते, पथ दिवे, पाणी पुरवठा आणि इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.त्यानुसार २१ पाड्यात ही विकासकामे करण्यासाठी नुकताच प्रशासकीय ठराव करण्यात आला आहे.
आता शहरातील २१ आदिवासी पाड्याच्या विकासाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.यात शासकीय नियमांच्या आधीन राहून अश्या पाड्यात पायवाट नेहणारा सीसी ( सिमेंट काँक्रीट ) रस्ता,सोलर पथ दिवे, स्मशाने, पाणी पुरवठा, समाज मंदिर आणि आरोग्य सेवा उभारण्यासाठी विशेष आराखडा तयार केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या विकास कामासाठी येणाऱ्या खर्चास २ नोव्हेंबर रोजी काटकर यांनी विशेष ठराव करून मान्यता दिली आहे.त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या सोयी- सुविधापासून वंचित राहिलेल्या या पाड्याना आता खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे.
मीरा भाईंदर महापालिकेचा थकीत राहिलेला अग्रीम निधी वसुल करण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे.याबाबत सर्व विभाग प्रमुखांना खर्चाचा अहवाल सादर करून त्यात येणारी तफावत पगारातून भरण्याचे आदेश आयुक्तानी दिले आहेत.
२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ही थकीत रक्कम १ कोटी २६ लाख १ हजार २७६ रुपयांपर्यंत वाढली होती. त्यावेळी प्रशासनाने थकीत अग्रीम वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्यानंतर थकीत अग्रीमपैकी ७५ लाख ३७ हजार ९८३ रुपये प्रशासनाकडून वसूल करण्यात आले.मात्र अद्यापही ५० लक्ष ६३ हजार २९३ रुपये अग्रीम थकीत आहे.
याच गोष्टीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त संजय काटकर यांनी थकीत अग्रीमच्या ठोस वसुलीसाठी कठोर पावले उचलल्यास सुरुवातीला केली आहे.ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अग्रीमची रक्कम अद्यापही जमा केलेली नाही त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढील वेतनामधून एकावेळी तब्बल ५० टक्के थकीत अग्रीम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
उस्मान मुस्ताक अली खान (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपा बाबत देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नव्हते.
अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री राखी सावंतशी तुलना केली आहे.
उरण – खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी काँग्रेसने गाजर दाखवा आंदोलन केले.
अमरावती: गेल्या वर्षापासून राज्यभर गाजत असलेल्या पटसंख्येच्या मुद्यावर शिक्षण विभागाने शोधलेला ऑनलाईन हजेरीचा उपाय शिक्षकांसाठी मात्र डोकेदुखी ठरू लागला आहे.
वर्धा: राज्यात मराठा आरक्षण आणि मंत्री छगन भुजबळ यांची त्याबाबतची भूमिका वादाची ठरली. तरीही नव्याने भुजबळ या विषयावर बोलले. त्याची दखल आमदार रोहित पवार यांनी घेतलीच. त्यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्ष यात्रा आज जिल्ह्यात पोहचली.
गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारची कामे करण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर अनेकदा ब्लॉक घेण्यात आलेला आहे.
नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या गटात जाणार? याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. (संग्रहित फोटो)