Mumbai News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट-भाजपा आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे ४०० ते ५०० अज्ञातांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आहेत.

याशिवाय आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. यासंदर्भात तक्रार दाखल करून ४८ तासांत महिला आयोगाला अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य महिला आयोकाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा विषयसुद्धा आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Marathi News Update :राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”

17:50 (IST) 31 Mar 2023
बाप रे.. नातवाच्या गळ्यातील साखळीसाठी चक्क वाघाची नखे! एकाने केली शिकार, दुसऱ्याने साधला डाव

भंडारा : कोका अभयारण्यातील परसोडी बिटमध्ये पाच दिवसांपूर्वी (२६ मार्च) टी- १३ या नर वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण हे त्यापेक्षाही अधिक भयंकर आहे. या वाघाचा मृत्यू नैसर्गिक नाही तर एका गुराख्याने सूड भावनेतून वाघावर विष प्रयोग करून त्याचा बळी घेतला, तर दुसऱ्याने नातवाच्या गळ्यात साखळी करण्यासाठी चक्क मृत वाघाची नखे काढली.

सविस्तर वाचा..

17:45 (IST) 31 Mar 2023
गोंदिया : ‘त्या’ वाघाचा मृत्यू विषबाधेमुळे; संशयित आरोपींना अटक

कोका वन्यजीव अभयारण्यात २६ मार्च रोजी  वाघाचा मृत्यू झाला होता. त्याचा शवविच्छेदन अहवाल वनविभागाला प्राप्त झाला असून त्यात नमुद केल्याप्रमाणे विषबाधा झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेतील दोन आरोपींना अटकही करण्यात आल्याचे वन विभागाने  म्हटले आहे. सविस्तर वाचा…

17:43 (IST) 31 Mar 2023
एच३एन२चा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे पालिकेकडून उपाययोजना, खासगी डॉक्टरांचा बनवला WhatsApp ग्रुप

शहरात करोना आणि एच ३ एन २ इन्फ्लुएन्झा आजाराचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून नागरी आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांनी खाजगी डॉक्टरांचे व्हॉटसॲप ग्रुप बनविले आहेत. सविस्तर वाचा…

17:30 (IST) 31 Mar 2023
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन पादचाऱ्यांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-नगर रस्ता आणि सोलापूर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

सविस्तर वाचा..

16:37 (IST) 31 Mar 2023
सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने सरकारचे धिंडवडे निघाले, आमदार खडसेंचे टीकास्त्र, गोपीनाथ मुंडेंबद्धल केले ‘हे’  गौप्यस्फोट…

सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर 'नपुसंक' या शब्दात केलेल्या भाष्यमुळे सरकारचे धिंडवडे निघाले असल्याचे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. दिवंगत पित्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांची पक्षात डावलले जात असल्याचा आरोप करून त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्धल दोन गौप्यस्फोट देखील केले.

सविस्तर वाचा…

16:36 (IST) 31 Mar 2023
अकोला : आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

जिल्ह्यातील उमरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गजानन दगडू हरमकार (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मुलीचे लग्न तोंडावर असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील कांदा पीक गेले. बँकेचे कर्ज देखील डोक्यावर होते. सविस्तर वाचा…

16:19 (IST) 31 Mar 2023
राज्यात दंगलीचा रामनवमी पॅटर्न सुरू झाला आहे – संजय राऊत

राज्यात दंगलीचा रामनवमी पॅटर्न सुरू झाला आहे. बेरोजगार तरुणांच्या हाती दगड देऊन दंगल घडवली जातेय, अशा गंभीर आरोप संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

15:25 (IST) 31 Mar 2023
पुणे : उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या; पत्नीपाठोपाठ पतीची आत्महत्या

पुणे : साडेतीन महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली. पत्नीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पतीने आत्महत्या केल्याने भाेर तालुक्यातील केळवडे परिसरात शाेककळा पसरली.

सविस्तर वाचा..

15:22 (IST) 31 Mar 2023
मुंबई : दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करणार, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना

परदेशातून येणाऱ्या २ टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे. सविस्तर वाचा…

15:22 (IST) 31 Mar 2023
मुंबई : नवजात अर्भकांची होणार थायरॉईड तपासणी; चाचणीसाठी आवश्यक कीट उपलब्ध

गर्भवती महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले असून अनेकदा मातेकडून नवजात अर्भकाला थायरॉईडची लागण होण्याची शक्यता असते. नवजात अर्भकातील थायरॉईडचे निदान वेळेत न झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो. सविस्तर वाचा…

15:21 (IST) 31 Mar 2023
पुणे : रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’; पुण्यात कोरेगाव पार्क परिसर सर्वांत महागडा, प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम

करोना संकटातून सावरून आर्थिक गाडी रूळावर आल्याने आणि पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन वार्षिक मूल्यदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुण्यात कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा असणार आहे. सविस्तर वाचा…

15:20 (IST) 31 Mar 2023
पुणे: अल्पवयीन मुलीला धमकावून बलात्कार करणारा अटकेत

अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका तरुणास हडपसर पोलिसांनी अटक केली. सूरज संतोष पवार (वय २१, रा. वेताळबाबा झोपडपट्टी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा…

15:19 (IST) 31 Mar 2023
पुणे : रोहित माझ्या मुलासारखा, त्याच्याबाबत मी असे करूच शकत नाही ; अजित पवार यांची स्पष्टोक्ती

रोहित माझा पुतण्या आहे. घरातील आहे. माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे रोहितबाबत मी असे काही करणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात केली. महाराष्ट्र क्रिक्रेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी पडद्यामागून अनेक प्रयत्न केले. सविस्तर वाचा…

15:17 (IST) 31 Mar 2023
नागपूर : ‘सकाळचा भोंगा’ बंद करा! बावनकुळेंनी राऊतांना पुन्हा डिवचले

राज्यात दंगली सारख्या घटना होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी महाविकास आघाडीने सर्वात आधी संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा बंद करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा

15:16 (IST) 31 Mar 2023
अकोला : मुलगी झाली म्हणून छळ; आईने संपविले जीवन, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १७ मार्चला एका बाळंतीण महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी मानसिक छळ केला. त्यामुळे १५ दिवसांच्या तान्हुलीला सोडून आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. सविस्तर वाचा…

15:04 (IST) 31 Mar 2023
बुलढाणा : मूक मोर्चातून काँग्रेसचा दडपशाहीविरुद्ध ‘आवाज’! हुतात्मा स्मारक परिसरात सत्याग्रहद्वारे निषेध

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात बुलढाण्यात आज काँग्रेसकडून मूक मोर्चा काढण्यात आला. समारोपात हुतात्मा स्मारक परिसरात सत्याग्रह करून कारवाईचा निषेध करण्यात आला. या ‘गांधीगिरी’ निमित्त जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकारी एकवटल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा..

15:02 (IST) 31 Mar 2023
शिवरायांचा अवमान झाला तेव्हा भाजपाला यात्रा सुचली नाही का? सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवारांची टीका!

राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपा शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेवरून अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. ज्यावेळी तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांचा अवमान केला, तेव्हा भाजपाला यात्रा काढावी, असं वाटलं नाही का? असे ते म्हणाले.

14:12 (IST) 31 Mar 2023
“आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले, “काही माणुसकी…”

भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढवेन, अशा आशयाचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा

14:04 (IST) 31 Mar 2023
“महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सावरकर गौरव यात्रा”, अजित पवार यांचा आरोप

पुणे : देशात आणि राज्यात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

सविस्तर वाचा..

13:59 (IST) 31 Mar 2023
आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे-फडणवीस सरकारकडून कात्री लावण्याचे पाप, जयंत पाटलांचा प्रहार

विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून, याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. सविस्तर वाचा

12:06 (IST) 31 Mar 2023
संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी, मविआच्या सभेपूर्वी परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अजित पवार यांची मागणी

संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. माझं संभाजीनगरमधील नागरिकांना सांगणं आहे, की कोणी जर तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असले, तर त्याला थारा देऊ नका, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबरोबरच सभेदरम्यान संभाजीनगरमधील वातावरण बिघडले, असं विधान कोणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

11:33 (IST) 31 Mar 2023
वर्धा : नवरदेव ग्नासाठी दारात, नवरी प्रियकरासोबत…

नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवित वाजतगाजत आलेल्या नवरदेवाच्या स्वप्नाचा भंग झाल्याची घटना रोहणा पंचक्रोशीत घडली आहे. सायखेडा येथील तरुणाचा विवाह अमरावती जिल्ह्यातील नवीन वाठोडा गावातील युवतीशी ठरला. पत्रिका वाटून तयार व विवाहपूर्व विधीही आटोपले.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 31 Mar 2023
नाशिक : एका केंद्रस्तरीय कार्यकर्त्यावर ३० घरांची जबाबदारी – राष्ट्रवादी बैठकीत अजित पवार यांचा कानमंत्र

विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक केंद्रस्तरीय समितीत एक समितीप्रमुख आणि १० कार्यकर्ते अशी नेमणूक करणार आहे. समितीतील प्रत्येक सदस्यावर त्या त्या केंद्रातील प्रत्येकी ३० घरांची जबाबदारी असेल. सविस्तर वाचा…

11:31 (IST) 31 Mar 2023
जामनेर तालुक्यात शालेय बस उलटली; विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी

जामनेर तालुक्यातील पहूर – शेंदुर्णीदरम्यान शुक्रवारी  सकाळी सातच्या सुमारास शालेय बस उलटून  विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी झाले आहेत. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. सविस्तर वाचा…

10:55 (IST) 31 Mar 2023
पुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलावरील वाहतुकीत बदल; २१ एप्रिलपर्यंत रात्री वाहतूक बंद

पुणे : मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी येरवड्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक २१ एप्रिलपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

सविस्तर वाचा..

10:54 (IST) 31 Mar 2023
कंपन्यांची ‘आयपीओ’तून निधी उभारणी निम्म्यावर; चालू आर्थिक वर्षात घटून ५२,११६ कोटींवर

मुंबई : मावळत असलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ५२,११६ कोटी रुपये उभारले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो निम्म्याहूनही अधिक घटला असून, जागतिक प्रतिकूल परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक कंपन्यांनी प्राथमिक बाजाराकडे पाठ केल्याचाही हा परिणाम आहे.

सविस्तर वाचा..

10:54 (IST) 31 Mar 2023
पिंपरी महापालिकेत सात गावांच्या समावेशाचा प्रस्ताव आठ वर्षांपासून धूळखात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून, ३० लाखांच्या आसपास लोकसंख्या पोहोचली आहे. शहरीकरण वाढत असतानाच शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा ठराव २०१५ मध्ये महापालिकेच्या सभेत झाला. मात्र, गेल्या आठ वर्षांत सात गावांच्या प्रस्तावावर शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नसताना आता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (छावणी) महापालिकेत समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सविस्तर वाचा..

10:53 (IST) 31 Mar 2023
नागपूर : रविभवनात खोडे-मिर्झांच्या नावाची आरक्षित खोली! ‘आरटीओ’ लाच प्रकरणात रोज नवीन माहिती उघड

नागपूर : काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने नागपूरच्या आरटीओकडून २५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात रोज नवीन माहिती पुढे येत असून, लाचखोर दिलीप खोडे थांबलेल्या रविभवनातच आमदार डॉ. मिर्झा यांच्या नावानेही वेगळी खोली आरक्षित होती. त्यामुळे दोघांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सविस्तर वाचा..

10:52 (IST) 31 Mar 2023
नागपूर : नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न, गर्भपातासाठी दवाखान्यात गेल्यावर..

नागपूर : पंधरा वर्षांच्या मुलीचे बापाने वारंवार लैंगिक शोषण केले. बापाच्या तावडीतून तिची सुटका व्हावी म्हणून प्रियकराने तिला पळवून नेले. मात्र, दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीने आता प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. त्यामुळे वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. कैलास राजकुमार अडमाचे (२५, आठवा मैल, वाडी) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा..

10:52 (IST) 31 Mar 2023
अमरावती : उड्डाणपुलावरील भेगांमुळे वाहतूक तात्पुरती बंद

अमरावती : शहरातील इर्विन चौक ते राजापेठ या उड्डाणपुलावर सांधे जोडण्‍याच्‍या ठिकाणी तीन इंचाच्‍या भेगा आढळून आल्‍याने या पुलावरील वाहतूक गुरुवारी मध्‍यरात्रीनंतर बंद करण्‍यात आली आहे. शहरातील मुख्‍य मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्‍यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्‍यात आली. या पुलावर तडे गेल्‍याचे गुरुवारी रात्री काही नागरिकांच्‍या लक्षात आले.

सविस्तर वाचा..

रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.