Maharashtra Politics News Updates, 01 August 2025: पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कोकाटेंची हकालपट्टी करावी, याची मागणी करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
या मारहाणीनंतर कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला होता. अशात आता माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढून त्यांच्या कडे क्रीडा खाते देण्यात आले आहे. दत्ता भरणे आता राज्याचे कृषी मंत्री असणार आहेत.
याचबरोबर काल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल आला असून, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र संततधार असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याचबरोबर राज्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया;
Mumbai Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार नेहरूंचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
पत्नीला डान्सबारमध्ये नाचविण्यासाठी पतीने ओलांडली छळाची परिसीमा
तरुणाची भर रस्त्यात हत्या; तीन संशयित ताब्यात; मालेगावमध्ये गुन्हेगारी वाढीस
आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय नाही - मुख्यमंत्र्यांची आंदोलक शिष्टमंडळाला ग्वाही
तब्बल १८ महिन्यांनंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी बिंदू नामावली तपासणीचा निर्णय, ३२ पेक्षा अधिक कर्मचारी…
शासकीय रुग्णालयातील भरती प्रक्रियेत गैरव्यवहार; जिल्हा शल्यचिकित्सकांसह तीन अधिकारी निलंबित
Yavat Violence : दौंडच्या यवतमध्ये कलम १४४ लागू, तणावाचं कारण काय? अजित पवार म्हणाले, "एका व्यक्तीने स्टेटस..."
भर रस्त्यात गोळीबाराचा थरार; मालेगावात चार गुंडांना अटक
नवीन कृषिमंत्री खात्याला न्याय देतील - छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
जळगावमध्ये भरधाव बसचा अपघात; एकाचा मृत्यू, ४५ प्रवासी जखमी
धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगतिलं, म्हणाले...
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाते नेते धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने ते मंत्रिमंडळात परतू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे. वेगवेगळ्या कारणांनी भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदाद आणि एकनाथ शिंदे करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘एमपीएससी’कडून नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अखेर सुधारणा…
"पदाधिकारी आहात, कुठे चूक होऊ देऊ नका", अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला देताना म्हटले की, "तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडनू कधीही, कुठेही आणि काहीही चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. कुठे जाऊन गोळ्या चालवू नका."
राज्यातील ज्युईश प्रार्थनास्थळांना पर्यटनाचा दर्जा; इस्त्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी यांची अलिबागला भेट
शिवशाही-ॲपेऑटोचा अपघात, रिक्षा चालक जागेवरच ठार; संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक
छत्रपती संभाजीनगर : बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बसचा आणि अपे रिक्षाचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना परळीजवळ शुक्रवारी सकाळी घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचालक असलेले श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे अपघातस्थळी असलेल्या शिवशाही बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती. ॲपेऑटो चालक शेतात कामासाठी महिलांना सोडून परळीकडे निघाला होता. त्यावेळी पांगरी कॅम्प नजीक हा अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात मृत ठरवलेली पत्नी घरी परतली; अंत्यसंस्कार केलेली महिला कोण? याचे गूढ वाढले
Devendra Fadnavis: "हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न", देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, "भगवा दहशतवाद…"
'मुख्यमंत्र्यांना विनंती, राज्याची प्रतिष्ठा जपा'; कोकाटेंच्या खातेबदलावरून सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत
रमी खेळातानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, "राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे."
"महाराष्ट्र शासनाला 'भिकारी' म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे."
आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, एसईबीसी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण, महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय
अनुकंपातत्वावरील शिक्षकांना आता पात्रता परीक्षा द्यावी लागणार, परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त होणार
"मोठ्या ज्ञानापासून वंचित राहिलो", संस्कृत येत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या भाषेच्या वादादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात संस्कृत भाषा शिकता आली नाही याची खंत वाटते, असे वक्तव्य केले आहे. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, "मोठ्या ज्ञानापासून वंचित राहिलो आहे. संस्कृत कुठल्याही वयात शिकता येते, त्यासाठी प्रयत्न करेन."
Manikrao Kokate : कोकाटेंचे कृषीमंत्रीपद गेलं, रमीचा व्हिडीओ बाहेर काढणाऱ्या रोहित पवारांची पोस्ट चर्चेत; इशारा देत म्हणाले, "खातेबदल केला म्हणजे…"
एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी सहाय्य करावे, मुख्यमंत्र्यांचे अशियाई बँकेला आवाहन
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध, मुख्यमंत्र्याची केंद्राला हस्तक्षेपाची विनंती
पशुपालनाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा; वीज, व्याज, मालमत्ता करात सवलत मिळणार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करू: मंत्री शिवेंद्रराजे भोसले
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून, त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तत्परता दाखवत असून, मातंग समाजाच्या भावना आहेत ते या सरकारने जाणून घेतल्यानंतर या गोष्टीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. लवकरच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
संशयाला पुराव्यांचा आधार नाही! मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाचा निकाल
Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात बदल, तुमच्या शहरांत १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
Maharashtra News Live Updates: “राष्ट्रवादीच्या गुंडांनी…”, माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावर छावा संघटनेची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतल्यानंतर यावर छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "या खातेबदलावर समाधानी असण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्याचे तुम्ही त्यांना बक्षिस दिले आहे का? कृषी मंत्र्यांना हाकलून द्या अशी आमची मागणी होती. कृषी खाते काढले म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचा संताप कमी होणार नाही", असे छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे.