Maharashtra Political Crisis Updates : करोनामुळे जवळपास दोन वर्ष आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागलेल्या दहीहंडी पथकांसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. कारण कोणत्याही निर्बंधांविना मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. राज्यात सत्तेची हंडी फोडणाऱ्या सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे ही हंडी पथकांसाठी अजूनच आनंदाची ठरणार आहे. एकीकडे दहीहंडीचा उत्साह असताना दुसरीकडे पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांशी संबंधित व्यावसायिकांच्या दिशेनं ईडीनं आपला मोर्चा वळवला आहे.
Mumbai-Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
गणेशोत्सवात आवाजांच्या भींतींचा (डॉल्बी) दणदणाट होवू द्यायचा नाही असा निर्धार पोलीस प्रशासन करीत असतानाच गणेशोत्सवात डॉल्बी वाजायलाच हवी आणि ती का वाजू नये याचे उत्तर देणारे पत्रकच डॉल्बीला नकार देण्याऱ्यांनी काढावे असा आक्रमक पवित्रा खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. सविस्तर वाचा…
राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडत असताना त्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आणि ‘ काय झाडी..काय डोंगार..काय हॉटेल..समदं ओक्केमंदी..’ या अफलातून संवादाने गाजलेले आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी येत्या रविवारी शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत हे शहाजीबापू पाटील यांच्या घरच्या मैदानात येणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...
महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात घुसून एका युवकाने स्वतःवरच चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. लक्ष्मण पवार असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. सविस्तर वाचा…
मढ येथील सिल्व्हर समुद्र किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांना दुर्मीळ 'लॉगहेड' कासव दिसून आले. त्यानंतर याठिकाणाहून त्याची सुटका करून ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात दाखल केले. प्राथमिक तपासणीत कासवाला फुप्फुसाचा दाह असल्याने समोर आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर जिल्ह्याचा कारभार अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्यात विभागून दिल्याने पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. जिल्हाध्यक्ष बाबा गुज्जर यांनी कार्याध्यक्ष राजू राऊत यांनी केलेल्या नियुत्या अवैध ठरवून त्यास स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघाची जबाबदारी वाटून दिली आहे. सविस्तर वाचा…
मोठ्या लाभाचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करुन डोंबिवलीतील एका खासगी गुंतवणुकदार कंपनीने येथील सात गुंतवणूकदारांकडून पाच लाख ते १० लाखा पर्यंतच्या रकमा स्वीकारल्या. त्यांना दिलेल्या वेळेत वाढीव परतावा नाहीच, पण त्यांची मूळ गुंतवणूक परत न करता त्या रकमेचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली आहे.
Dahi Handi 2022 Celebration : ठाणे शहराच्या विविध भागातील प्रमुख चौकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उभारलेल्या दहीहंड्या, या उत्सवाच्या ठिकाणी डिजेच्या तालावर थिरकरणारे गोविंदा पथके, गोविंदा पथकांचा उंच मानवी मनोरे रचण्याचा थरार आणि रस्त्यांवर निघालेले गोविंदा पथकांचे जथ्ये…असे चित्र दिवसभर होते. करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण आणि उत्सवावरील निर्बंध हटविले असून यामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी आयोजकांसह गोविंदा पथके मोठ्या उत्साहात उत्सव साजरे करताना दिसून आले. नौपाडा भागातील मनसेच्या दहीहंडीत कोकणनगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर लावले. गोविंदा पथकांचा हा थराचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याने संपुर्ण शहराला जत्रेचे स्वरुप आले होते. वाचा सविस्तर बातमी...
भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे, असे शेलार म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींना बोलत होते. वाचा सविस्तर
मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे सांगितले. तसेच सर्व सविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय. छा-छान वाटतंय, असं मिश्किल भाष्यदेखील केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते. वाचा सविस्तर
विविध भागात तलाठ्यांसह इतर अधिकारी- कर्मचारी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व अन्य नुकसानीचे पंचनामे करत आहेत. या तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गावात आल्याची घोषणा तेथील मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करावी, अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. सविस्तर वाचा…
धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी तत्कालिन फडणवीस सरकारने लागू केलेल्या विविध २२ योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याच्या आयुक्त, उपायुक्तांना दिले आहे.
सुंगधित द्रव्य तयार करण्यासाठी उपयुक्त असलेली व्हेल माशाची एक कोटी ६० लाख रुपये किमतीची उलटी पोलिसांच्या विशेष पथकाने डोंबिवलीतून जप्त केली आहे. या उलटीची तस्करी करणाऱ्या दोन जणांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री एक वाजता अटक केली. सविस्तर वाचा…
Dahi Handi 2022 Celebration: गेल्या दीड ते दोन महिन्यात खूप घडामोडी घडल्या असून त्या दरम्यान आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. हंडी कठीण होती. पण, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल, असे सूचक विधानही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटातुन आणखी कोण बाहेर पडणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. वाचा सविस्तर बातमी...
कलिना येथील एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर घरे रिकामी करण्याची टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा देऊ शकत नसल्याचे कंपनी आणि केंद्र सरकारने स्पष्ट केल्यावर उच्च न्यायालयाने घरे रिकामी करण्यासाठी कंपनीने बजावलेल्या नोटिशीविरोधातील कर्मचाऱ्यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश आहे. वाचा सविस्तर बातमी...
आगामी सार्वत्रिक निवडणूक अडीच वर्षांवर येऊन ठेपलेली असताना देशभरातील पक्ष आणि त्यांच्याशी निगडित संस्था निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन आखताना दिसत आहेत. भाजपाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्थादेखील (आरएसएस) सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. आरएसएसने तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच तेथील प्रमुख माध्यमांच्या संपादकांशी बंद दाराआड बैठक घेतली आहे. माध्यमांच्या संपादकांशी बैठक घेण्याची आरएसएच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर
नागपुरातील तरुणाने घुग्घुसमधील एका तरुणीशी ‘फेसबुक’द्वारे मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणाने लग्नाचे खोटे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढली आणि बदनामी करण्याची धमकी दिली. यादरम्यान त्याने तरुणीचे काही आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमावर सार्वत्रिकही केली. प्रेमात धोका मिळालेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी...
दुर्धर आजार तसेच आर्थिक नुकसानामुळे नैराश्यातून आयुष्य संपविण्यासाठी घर सोडून गेलेल्या डॉक्टर महिलेचा पोलिसांनी काही तासांत शोध घेतला. आत्महत्येपासून परावृत्त करत या महिलेचे मनपरिवर्तन केले. लष्कर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत. सविस्तर वाचा…
Dahi Handi 2022 Celebration Mumbai : मुंबईत तब्बल दोन वर्षानंतर दहीहंदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. सकाळपासून आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गोविंदा जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
Bilkis Bano case: सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील दोषींची सुटका केल्याने संताप व्यक्त केला असून, भाजपाला लक्ष्य केलं आहे. गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते असा आरोप ओवेसींनी केला आहे. ओवेसी यांनी ट्वीट केलं असून नशीब नथुराम गोडसेला तरी फासावर लटकवलं अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर वनपरिक्षेत्रात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एक वाघ जखमी अवस्थेत दिसून आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा पट्टेदार जखमी वाघ जंगलात फिरत असून त्याच्या डोळा व कानाजवळ जखम असल्याचे ट्रॅप कॅमेरात आढळून आले आहे. चिमूर लगत खडसंगी व झरी परिसरात हा जखमी वाघ फिरत असल्याचे समजते. वाचा सविस्तर बातमी...
आम्ही पोलीस आहोत, पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्या गळ्यातील जी सोनसाखळी आहे ती काढून रूमालात ठेवा असे सांगत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ४५ हजारांना गंडा घातला आहे. अंबरनाथच्या नवरे पार्क परिसरात रस्त्यावर गुरूवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दोनच दिवसांपूर्वी बदलापुरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी सोनसाखळी लंपास केली होती. सविस्तर वाचा…
Dahi Handi 2022 Celebration : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी उत्साहात जन्माष्टमीची सुटी जाहीर केली. पण आदेश काढताना तो फक्त मुंबईसाठी काढला. त्यामुळे घोळ झाला. अनेकांनी आज सुटी आहे असे गृहीत धरले होते. पण ऐनवेळी त्यांना सुटी नाही, असे कळल्याने त्यांची तारांबळ उडाली. वाचा सविस्तर बातमी...
कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थीनीचा मानसिक, लैंगिक छळ करुन तिचा विनयभंग करणाऱ्या अंबरनाथ मधील चिखलोली भागातील तरुणाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी हा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा…
राज्यातील सत्तातरांतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालिकेतील उपायुक्त संगीता हसनाळे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून परिमंडळ १ च्या उपयुक्त पदी बदली करण्यात आली होती. मात्र पाचच दिवसात त्यांची बदली रद्द करून त्यांना परिमंडळ १ आणि घनकचरा व्यवस्थापन दोन्ही पदांचा कार्यभार देण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरू लागला असतानाच 'स्क्रब टायफस’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचे तब्बल ९ रुग्ण आढळले असून एकट्या खामगाव तालुक्यातील ७ रुग्णांचा यात समावेश आहे. यातील एका गंभीर रुग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहे. सदर रुग्ण जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) असल्याचे सूत्रांनी सांगितले. सविस्तर वाचा…
पुण्यातील टिळक चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी चालक महिलेवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाहीतर, आमच्या विरोधात जर तू तक्रार केलीस, तर तुझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार करू, अशी धमकी देखील आरोपी महिलेच्या पतीने दिली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी...
अनैतिक संबंध आणि कामाच्या पैशावरून बांधकाम ठेकेदाराच्या डोक्यात हातोडीने वार करून एका मजुराने खून केला. ही घटना आज गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी मजुरास पोलिसांनी शिवनीतून अटक केली. विनोद मडावी (३०, शिवनी-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना अहेरी येथे उघडकीस आली आहे. निर्मला अत्राम असे मृत महिलेचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर बातमी...
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी "लवकरच जनता त्यांना बुटाने मारणार आहे," असे विधान केले आहे. याधी सुगतो रॉय यांनी जे पक्षाला (तृणमूल काँग्रेस) बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची कातडी सोलून बुट तयार करू, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला उत्तर म्हणून दिलीप घोष यांनी वरील विधान केले आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे
Mumbai-Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!