Maharashtra Assembly Monsoon Session Updates : महाराष्ट्रातील जनतेसह ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यातल्या फडणवीस सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. यानिमित्त शिवसेना (ठाकरे) व मनसे हे दोन्ही पक्ष मिळून एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. चलो वरळी म्हणत ‘सामना’मधून (ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र) या विजयी मेळाव्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मेळाव्याला राज व उद्धव ठाकरे उपस्थित असतील. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं दिसत आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी दुसऱ्या कोणाचाही अर्ज न आल्याने आज चव्हाण यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
दुसऱ्या बाजूला शिवसेना (शिंदे) नेते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं प्रमुखपद स्वीकारण्याची विनंती केली होती जी विनंती शिंदेंनी नाकारली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपाच्या मुख्य पक्षकार्यालयात दुपारी दोन वाजता पाटलांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.
यासह महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. आज अधिवेशनचा दुसरा दिवस असून विधीमंडळात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.
Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
रविंद्र चव्हाण भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष, किरेन रिजिजू यांनी केली घोषणा
भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज (१ जुलै) निवड करण्यात आली आहे. भाजपाचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण हे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यास ५० लाखांचा उपचारासाठी व मृत्यूसाठी १ कोटी रुपयांचा विमा शासनाने द्यावा; कोकण विकास समितीची मागणी
ए.आय. तंत्रज्ञानावर महाराष्ट्रातील पहिले कृषी ई-प्रक्षेत्र ग्रंथालय; शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवलीचा उपक्रम
काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपात प्रवेश
काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दोन वर्षे अकरा महिने:बावनकुळेंची कारकीर्द:भिंगरी लागल्या सारखे फिरणारे प्रदेशाध्यक्ष
जळगाव जिल्ह्यातील ३०० गावांत एकाचवेळी स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम
अनिल परबांचा गृहराज्यमंत्र्यांवर चोरीचा आरोप! पुरावे असल्याचा दावा, सरकारकडे कारवाईची मागणी
'राष्ट्रीय आरोग्य अभियान' कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन!
"मोदी तुमचा बाप...", पटोले व सत्ताधारी आमदारांमध्ये राडा; फडणवीस म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं..."
भाजपा आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अलीकडच्या काळात केलेल्या वक्तव्यांवरून आज विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले, "लोणीकर व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आपला अन्नदादा हे सहन करणार नाही. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, तो शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. त्यामुळे याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे."
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संतापून म्हणाले, "अशी असंसदीय भाषा सभागृह स्वीकारणार नाही. हे चुकीचं आहे. तसेच नार्वेकरांनी पाच मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज स्थगित केलं होतं. याचदरम्यान, नाना पटोले, विधानसभा अध्यक्षांच्या टेबलाजवळ जाऊन बोलू लागले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं चुकीचं आहे. हे नाना पटोले यांना शोभत नाही."
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हाडाचे घर घेण्याची संधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची खासगीकरणाकडे वाटचाल; खासदार राजाभाऊ वाजे यांचा आरोप
शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार, पोलिसांचं पथक राजू शेट्टींच्या घरी; आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस
शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या राजू शेट्टी यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (मंगळवार, १ जुलै) सकाळी ११ वाजता पुणे -बंगळुरू महामार्ग, पंचगंगा पूल शिरोली या ठिकाणी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. शेकडो शेतकरी या पुलावर जमले असून पोलीसही दाखल झाले आहेत.
पावसाळा सुरू होताच रान भाज्यांची आवक वाढली; रानभाज्यांच्या विक्रीतून रोजगार
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं ठिकाण व वेळ ठरली, 'असा' असेल भव्य कार्यक्रम; कोण-कोण येणार? राऊतांनी दिली माहिती
शिवसेना (ठाकरे) - मनसेचा चलो वरळीचा नारा
महाराष्ट्रातील जनतेसह ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यातल्या फडणवीस सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. यानिमित्त शिवसेना (ठाकरे) व मनसेने एकत्र विजयी मेळावा घेण्याचं ठरवलं आहे. चलो वरळी म्हणत 'सामना'मधून (ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र) या विजयी मेळाव्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मेळाव्याला राज व उद्धव ठाकरे उपस्थित असतील. वरळीतील एनएससीआय डोम येथे हा मेळावा पार पडेल. ठाकरे गटाकडून या मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडे तर, मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे व नितीन सरदेसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.