Maharashtra Breaking News Updates, 17 October 2025: राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही महत्त्वाची पदे आणि अधिक जागा मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.

याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates

19:09 (IST) 17 Oct 2025

‘काळी दिवाळी’आंदोलन : शेतकऱ्यांसाठी काँग्रेसची ‘झुणका-भाकर’ शिदोरी…

पिकांचे नुकसान, वाढती कर्जबाजारी परिस्थिती आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ...सविस्तर वाचा
19:02 (IST) 17 Oct 2025

‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ होणार सदिच्छादूत

थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवांशिक आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. ...सविस्तर वाचा
18:54 (IST) 17 Oct 2025

MPSC 2026 Exam Schedule : मोठी बातमी… एमपीएससीकडून २०२६ मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

MPSC Tentative Dates, 2026 Exams : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२६ मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवांसह विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. ...अधिक वाचा
18:48 (IST) 17 Oct 2025

भाऊबीज, पाडव्याला राणीची बाग खुली

दिवाळीदरम्यान असणाऱ्या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
18:25 (IST) 17 Oct 2025

दिवाळीत आरोग्य यंत्रणा सतर्क; प्राथमिक केंद्रांना अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची सूचना

दिवाळीसारख्या सणामुळे खाद्यपदार्थांमधून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका लक्षात घेता दिपोत्सव काळात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
18:16 (IST) 17 Oct 2025

आव्हाडांची एकनाथ शिंदेंकडे मागणी म्हणाले, "कळव्याचा खाडी पूल…"

ठाणे बेलापूर मार्गावरुन कळवा, विटावा मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी कळवा नाका येथून हजारो वाहने वाहतुक करतात. ...सविस्तर बातमी
18:15 (IST) 17 Oct 2025

उसाच्या पाचटातून शाई बनवण्याचा प्रयोग, मुद्रण यंत्रासाठी उपयोग

उसाचा चोथा झाल्यानंतरच्या पाचटापासून शाईचा उपयोग संगणकीय मुद्रण यंत्रातील कोरडी बुकटी (टोनर) म्हणूनही करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहेत. ...अधिक वाचा
17:53 (IST) 17 Oct 2025

सदानंद दाते यांच्या नावाचा वापर करून ४० लाखांची फसवणूक, सहा जणांची टोळी अटकेत

फिर्यादींना २५ सप्टेंबर रोजी फोन आला होता. तीन व्यक्तींनी त्यांना दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) येथून बोलत असल्याचे सांगितले. ...सविस्तर वाचा
17:47 (IST) 17 Oct 2025

दिवाळीत खोबर्‍याला उच्चांकी भाव; किरकोळ बाजारात ५०० रुपये किलो

Coconut, Khobra : किरकोळ बाजारात एक किलो खोबऱ्याचा भाव ५०० रुपयांवर पोहोचल्याने दिवाळीत करंजी व चिवड्यासाठी खोबरे खरेदी करणाऱ्या गृहिणींना मोठा फटका बसला आहे. ...सविस्तर बातमी
17:47 (IST) 17 Oct 2025

कोपर रेल्वे स्थानकातील फलाटांच्या विस्तारिकरणाला प्रारंभ, प्रवाशांना काही दिवस वळसा घेऊन जावे लागणार फलाटावर

कोपर रेल्वे स्थानकातील कल्याण बाजूकडील फलाट क्रमांक दोन विस्तारिकरणाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
17:25 (IST) 17 Oct 2025

ठाण्यात शरद पवार गटाकडून ‘काळी दिवाळी’साजरी

राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले. ...सविस्तर वाचा
17:13 (IST) 17 Oct 2025

औषधनिर्माणशास्त्राच्या सर्वच महाविद्यालयांवरील प्रवेश बंदी उठवली, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

महाविद्यालयांनी न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही बंदी उठविण्याचे आदेश पीसीआयला दिले. ...वाचा सविस्तर
17:08 (IST) 17 Oct 2025

Diwali Pahat 2025: दिवाळी पहाटनिमित्त शहरात कार्यक्रमांची मांदियाळी

दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ...अधिक वाचा
17:01 (IST) 17 Oct 2025

डिबेंचर कपातीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध का केला नाही; सतेज पाटील यांनी शौमिका महाडिकांना डिवचले

डिबेंचर कपातीचा मुद्दा गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आला असताना तेव्हा विरोध न करता त्यावर सहमतीची सही यांनीच केली होती, आमदार सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांना डिवचले. ...अधिक वाचा
16:57 (IST) 17 Oct 2025

दिवाळीनिमित्ताने ठाणे बाजारपेठ परिसरात वाहतूक बदल

दिवाळी निमित्ताने ठाणे बाजारपेठ, जांभळीनाका येथे खरेदीसाठी नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. ...सविस्तर वाचा
16:53 (IST) 17 Oct 2025

ठाणे: जिल्हा परिषदेत भाजपला सन्मानजनक युतीची अपेक्षा

भाजपकडून जिल्ह्यात चाचपणी, कपील पाटील यांच्याकडून शहापूर, भिवंडीचा आढावा ...वाचा सविस्तर
16:42 (IST) 17 Oct 2025

डिबेंचर प्रश्नावरील गोकुळवरील मोर्चा हृदयावर छिद्र निर्माण करणारा; हसन मुश्रीफ यांची सल

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने डिबेंचर बाबत तपशीलवार चर्चा प्रश्न एकदाच काय तो संपुष्टात आणावा.काल गोकुळ दूध संघावर आलेला मोर्चा हृदयावर छिद्र निर्माण करणारा होता, अशी सल हसन मुश्रीफ व्यक्त केली. ...अधिक वाचा
16:21 (IST) 17 Oct 2025

ठाणे : बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीसाठी गर्दी

गोखले रोडवरील काही दुकानांमध्ये ग्राहकांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. तसेच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील व्यापारी देत आहेत. ...सविस्तर वाचा
16:13 (IST) 17 Oct 2025

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून

मागील दोन टप्प्यांमध्ये राज्यातील तब्बल ९५ टक्के शाळांनी सहभाग नोंदवून ‘सुंदर शाळा’ हे अभियान यशस्वी ठरवले होते. ...सविस्तर वाचा
16:00 (IST) 17 Oct 2025

नामांकित कंपनीच्या बनावट बुटांची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा, पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला

पोलिसांनी एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...वाचा सविस्तर
15:58 (IST) 17 Oct 2025

"बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तेचा गैरवापर", शरद पवार यांचा आरोप

काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, राजकीय पक्षांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बिहार निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बिहारमध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत.

15:43 (IST) 17 Oct 2025

'पोषण भी, पढ़ाई भी' प्रशिक्षणाला ठाण्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद; ३ हजार ३८१ अंगणवाडी सेविकांचा सहभाग

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १७ एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
15:40 (IST) 17 Oct 2025

दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीने लोकल खोळंबल्या, दिवा ते कोपर दरम्यान लोकलच्या रांगा

दिवा रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा मुंब्रा आणि कोपर दिशेने लोकलच्या एकापाठोपाठ रांगा लागल्या होत्या. ...वाचा सविस्तर
15:07 (IST) 17 Oct 2025

आरे - कफ परेड मेट्रो ३ : आठवड्याभरात १० लाख प्रवाशांनी केला प्रवास, प्रतिदिन प्रवासी संख्या दीड लाखापार

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण केले आहे. ही मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
14:57 (IST) 17 Oct 2025

वसई : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यांमध्ये रांगोळी, दिवे लावून आंदोलन

पावसाळ्यापासून वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 17 Oct 2025

चितळे डेअरीकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत

मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्यासाठी चितळे डेअरीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपला वाटा उचलला आहे. ...सविस्तर वाचा
14:42 (IST) 17 Oct 2025

रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे त्रस्त पुणेकरांनी केली अनोखी मागणी !

खड्डे पडलेल्या रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार का?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करत संघटनेते डॉ. अनुपम बेगी यांनी महापालिका आणि कटक मंडळातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...सविस्तर बातमी
14:42 (IST) 17 Oct 2025

पुण्यातील मतदार यादीत घोळ?, ‘या’ सनदी अधिकाऱ्याचे नाव दोन वेळा…

मतदार तेच आहेत. फक्त त्यांचे पत्ते बदलेले आहेत. पडताळणी करताना खडकवासला, भोर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या यादीत अशी अनेक नावे आढळून आली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.’ ...वाचा सविस्तर
14:41 (IST) 17 Oct 2025

‘ऑक्सफोर्ड’च्या शब्दकोशावर सावंतवाडीची खेळणी

‘ऑक्सफोर्ड’ने निर्मिती केलेल्या दोन शब्दकोशांच्या मुखपृष्ठावर सावंतवाडीची खेळणी आणि वारली शैलीतील कलात्मक दागिने साकारण्यात आले आहेत. ...अधिक वाचा
14:41 (IST) 17 Oct 2025

शिधा दुकानदारांना लाभ रकमेची प्रतीक्षा; दिवाळी तोंडावरही मार्जिन थकित

पुणे शहर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे कमिशन रखडले आहे. २५ ऑगस्टपूर्वी प्रतिक्विंटल १५० रुपये असे कमिशन आकारण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा