Mumbai Maharashtra News Live Updates, 03 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मनसेच्या युतीबाबतचे संकेत दिले आहेत. ‘मराठीच्या मुद्द्यावर मी आणि राज ठाकरे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. या बरोबरच नारायणगडावरून मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, यासह शेतकऱ्यांना पगार सुरू करा, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
....तर सरकारी लाभ मिळणे बंद; राज्य सरकारकडून कठोर कारवाईचा प्रस्ताव
AYUSH Ministry Maharashtra : राज्यातही लवकरच आयुष मंत्रालय - केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांची माहिती
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांसाठी आता ‘इफ्सा’, केंद्राच्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून मिळणार सेवा
शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी माजी आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे, शिळफाटा रस्त्यासाठी वाहतूक आराखडा तयार करा
मुरबे बंदर प्रकल्प : जनसुनावणीविरोधात एमपीसीबीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा धडकणार
विक्रीसाठी आणलेल्या दुचाकी चेंबूरमधील पदपथावरच उभ्या; महापालिका आणि वाहतूक पोलिसांचा कानाडोळा
डोंबिवली आयरेमध्ये चाळीतील घर खरेदीत साई एन्टरप्रायझेसकडून सहा लाखाची फसवणूक
सोलापुरच्या एमआयडीसी परिसरातील तुळजाई केमिकल्स कंपनीला भीषण आग
सोलापुरातल्या एमआयडीसी परिसरात रासायनिक उद्योगाच्या प्रकल्पात भीषण आग लागली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी या ठिकाणी असलेल्या तुळजाई केमिकल्स कंपनीला ही आग लागली आहे. यामुळे एमआयडीसी परिसरातील आसपासचे कारखाने रिकामे करण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ठाणे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे लाचप्रकरणात आणखी एकाला अटक; तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडून घेतले होते दहा लाख रुपये
दहिसर नदीतून हरणाचे दुहेरी संकट; सकाळी पडलेले हरिण सुखरुप बाहेर, सायंकाळी पडलेले हरिण अद्याप बेपत्ता
मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीत तांत्रिक बिघाड, चालत्या मेट्रो गाडीतून उडाल्या ठिणग्या; प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
गेल्या पाच वर्षात अमली पदार्थाचे १६३ गुन्हे दाखल, या कारवाईत जप्त केलेला १४३ कोटींचा साठा ठाणे पोलिसांनी केला नष्ट
"रामदास कदम एवढे दिवस गप्प का होते?", अंबादास दानवेंचा सवाल
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर दावा केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा या संदर्भात मोठं भाष्य करत आपण विधानावर ठाम असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं. दरम्यान, त्यांच्या या विधानावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम एवढे दिवस गप्प का होते? असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.
पात्रता नसताना शंकर पाटोळेंना उपायुक्त पदावर बसविले, काँग्रेस प्रवक्त्यांने आरोप करत दाखविले पुरावे
मुंबई महानगरपालिकेच्या शाळा होणार १० मजली; अद्ययावत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सभागृह, इनडोअर खेळांची सोय
एमएमआरडीए ‘मेट्रो ५’साठी २२ गाड्या खरेदी करणार; टिटागढ रेल सिस्टीमला कंत्राट बहाल
नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’, ९ जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
ठाण्यात नवरात्रोत्सवातही कृत्रिम तलाव संकल्पनेस ठाणेकरांचा प्रतिसाद; ठाण्यात १,६९१ देवी मूर्तीचे तर, १०,५६२ घटाचे विसर्जन
Ramdas Kadam : "मी खोटं बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सांगून दाखवावं", बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत दावा करणाऱ्या रामदास कदमांचं थेट आव्हान!
Sawai Gandharva Bhimsen Festival: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आहे नेमका कधी? रसिकांना उत्सुकता असलेल्या महोत्सवाच्या तारखा जाहीर
ऋता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र झळकणार, ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा
पुण्यातील बाणेरमधील वाहतूक कोंडीबाबत महापालिकेने उचलले मोठे पाऊल !
Maharashtra E-Bond : महाराष्ट्रात आजपासून E-Bond प्रणाली सुरू; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ई-बॉण्ड नेमकं काय आहे?
'उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
"मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. कारण त्यांनी माझे एक हजार वाचवले आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा दाखवा आणि एक हजार मिळवा असं म्हटलं होतं. त्याबाबत काल त्यांच्या मेळाव्यात त्यांनी विकासाबाबत भाष्य केलं का? हे मी दोन-तीन जणांना विचारलं तेव्हा ते संपूर्ण भाषणात विकासाबाबत काहीही बोलले नाही. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी अपघात; लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
Manoj Jarange : 'माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन', मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना मोठा इशारा
दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदीचा उत्साह; परिवहन विभागात तीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी; ११ कोटी ५९ लाखांचा महसूल
Potholes issues vasai virar : खड्ड्यांसाठी कोट्यावधी; रस्ते दुरुस्ती व नूतनीकरणासाठी नव्याने निविदा
सातपाटीच्या निम्म्या बोटींना गाठता आली नाही जेट्टी; गाळ, चिखलातून बर्फ व इतर सामग्रीची करावी लागली वाहतूक
पवारांच्या आमदाराचा मुलगा भाजपमध्ये येणार? शहराध्यक्ष म्हणाले तो निर्णय…!
कोकणातली राजकीय गणितं बदलणार? राजन तेली शिंदे गटात; ठाकरेंना सोडण्याचं दिलं ‘हे’ कारण!, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)