Mumbai Maharashtra Updates, 06 December 2022 : बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम संथगतीने सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच इंदू मिल येथील जागेची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. दरम्यान, आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा मुद्दा दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Latest Marathi Batmya , 06 December 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो- एकनाथ शिंदे
पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. वसंत मोरे यांच्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा वागसकर यांनी केला आहे.
दादरच्या इंदू मिलमध्ये होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोडला आहे. आतापर्यंत स्मारकाच्या इमारतीचे ५० टक्के, तर एकूण प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीएसमोर आहे. बातमी वाचा सविस्तर…
महापरिनिर्वाण दिनी लोकल वेळापत्रक सुरळीत ठेवण्याची सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेली असताना मध्य रेल्वेवरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद आणि कल्याण दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक दुपारी १२ वाजल्यापासून विस्कळीत झाले आहे. लोकल विलंबाने धावत असून प्रवाशांना मोठ्या गर्दीला सामोरे जावे लागत आहे.बातमी वाचा सविस्तर…
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शंभूराज देसाई यांनीदेखील या हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला असून लवकरच आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहोत, असे मत व्यक्त केले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. वाचा सविस्तर
करंजा धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या मच्छिमार बोटीला मंगळवारी सकाळी आग लागली आहे. या आगीत संपूर्ण बोट जळून खाक झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बोटीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोटीतील स्टो ने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बातमी वाचा सविस्तर…
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पेटला असतानाच बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक कऱण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला असतानाच, दगडफेकीमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आता मंगळवारी (६ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे सुनावणी घेतली जाईल, असं स्पष्ट करत तारखेची घोषणा केली. यानुसार या सर्व याचिकांवर पुढील महिन्यात १३ जानेवारी २०२३ रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होईल.
नवी मुंबई : गुटखा सुंगधित सुपारी प्रमाणेच ई-सिगारेटलाही राज्यात बंदी आहे. बंदी असतानाही ई-सिगारेटचे (E cigarettes) व्यसन असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून नवी मुंबईत केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात गणेयात आले आहे. बातमी वाचा सविस्तर…
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी भेट होऊन चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून, वंचित महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या संमतीचीही आवश्यकता आहे. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह आहे, असं मत व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या अंनिवा वार्षिक विशेषांकांच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात डॉ. 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयी विचार' या विषयावर हेमंत गोखले बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पांवरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच या लोकांना कोकण मागास ठेऊन, लोकांच्या भावना भडकवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे, असा गंभीर आरोप केला. यावेळी फडणवीसांनी कोकणात रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाही, अशी टीका होत असल्याचं सांगत त्यांना प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी (६ डिसेंबर) मुंबईत स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलत होते.
सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे पाचही ग्रह डोळ्यांनी सहजपणे पाहता येत आहे. सद्यस्थितीत हे सर्व ग्रह संध्याकाळी एकाच वेळी बघता येत आहेत. ८ डिसेंबर रोजी लालसर रंगाचा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने हा ग्रह अप्रतिम दिसणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
भामरागड तालुक्यातील कोठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आला. बातमी वाचा सविस्तर…
हस्ताक्षर चांगले नसल्याने विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना वानवडी भागातील एका शाळेत घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचा सहा वर्षांचा मुलगा लुल्लानगर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. सविस्तर वाचा…
जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरच्या गुणवत्तेसंदर्भात सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यासंदर्भातील निकाल येणे अद्याप बाकी आहे, या पार्श्वभूमीवर जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीविरोधात २०१४ मधील दाखल झालेल्या रिट याचिका आणि सध्या सुरू असलेले प्रकरण सारखेच आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्रित करण्यात यावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांनी सुरुवात केली आहे. लवकरच या चाचण्या पूर्ण होतील आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर तात्काळ या मार्गिकांचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सविस्तर वाचा…
मुंबई – जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्यावर मेट्रोचे गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्याने मंगळवारी सकाळ पासून पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी पहाटे ६ च्या सुमारास हे काम पूर्ण झाले, मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत घाटकोपर छेडा नगर परिसरात वाहनानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सविस्तर वाचा…
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला बहुचर्चित नागपूर- मुंबई हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. पण फक्त समृध्दी महामार्गाचेच नव्हे चार इतर प्रकल्पाचे उद्घाटन सुध्दा मोदी करणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…
मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे १९८६ बेळगावमध्ये झालेल्या आंदोलनाचीही आठवण सांगत राज्य सरकारला टोला लगावला आहे. शरद पवारांनी १९८६ च्या आंदोलनात पोलीसांच्या लाठ्या खाल्ल्या, पण माघार घेतली नाही, असे त्या म्हणाल्या. सविस्तर वाचा –
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात कायदेमंडळाची भूमिका लक्षात घेता भारतीय दंड विधानातील ४९८-अ कलमामधील तरतुदीचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे ही क्रूरताच होय, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर…
घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळताना पडलेले फूल काढताना वीजवाहिनीचा धक्का बसून दहा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लोणीकाळभोर भागात घडली.
भाग्यश्री धनाजी बनसोडे (वय १०) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी भाग्यश्री घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळत होती. सविस्तर वाचा…
मुंबईतील गोवरमुळे मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली असून यापैकी आठ रुग्णांचा गोवरने मृत्यू झाल्याचे निश्चित झाले होते, तर चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून झाली होती. मात्र सोमवारी यापैकी एका रुग्णाचा मृत्यू विश्लेषणाचा अहवाल नकारात्मक असल्याचे प्रयोगशाळेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील संशयित गोवर मृत्यूंची संख्या आता तीनवर झाली आहे. सविस्तर वाचा…
कुठल्याही कागदपत्रांशिवाय ११०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविणार्या एका ई-सेवा केंद्राच्या मालकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अरुणेशकुमार शामनारायण मिश्रा असे या मालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. आज, मंगळवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात? याबाबत विविध तर्क लावले जात आहे. बातमी वाचा सविस्तर…
नवी मुंबई एमआयडीसीतील एका ठिकाणी गटार साफ करत असताना अचानक त्यातील गाळातून उग्र वास आल्यामुळे दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तिसरा कामगार मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अनेकदा रात्रीच्या अंधारात प्रक्रिया न करता पाणी सोडतात असा आरोप नेहमीच केला जातो. बातमी वाचा सविस्तर…
राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने खरंतर सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण, या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हे मंत्री सीमाभागांतील मराठी बांधवांची भेट घेणार असून राज्य सरकार मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही उत्तर दिलं.
चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर टाकण्याची नामुष्की येताच शिंदे- फडणवीस सरकारने आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी सारवासारव सुरू केली. दरम्यान, यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून हे नेभळट सरकार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी माईक खेचण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोलाही लगावला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुमारे १० कोटींच्या खर्चातून अद्ययावत क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाकडे मागितला आहे. बातमी वाचा सविस्तर…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका. बातमी वाचा सविस्तर…
Mahaparinirvan Diwas : बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. सविस्तर वाचा
पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात आणि मुख्यमंत्र्यांची मुलाखत नाना पाटेकर घेतात, मग पत्रकार काय खुळली आहेत का? अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी भाजपा-शिंदे गटावर केली. उस्मानाबादमध्ये आयोजित शिवसेनेच्या ‘महाप्रबोधन यात्रे’त त्या बोलता होत्या. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं. सविस्तर वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच सामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज मुख्यमंत्री होऊ शकली, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.