Maharashtra Live News Updates, 24 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आघाडी व युतीसंदर्भातल्या चर्चा झडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकितं केली जाऊ लागली आहेत. असं असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच दुसरीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्याच कार्यकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे. ‘तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल’, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Weather News Live Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.

17:56 (IST) 24 Oct 2025

Pimpri Chinchwad Crime News: दुचाकी हळू चालव म्हटल्याने दगडाने मारहाण

तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून वरून जात असताना तो घसरला. ...वाचा सविस्तर
17:49 (IST) 24 Oct 2025

दिवाळीनंतर मुंबई-पुण्यात परतण्याची लगबग; महामार्गांवर कोंडीची शक्यता; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या पोलिसांकडून सूचना

दिवाळी संपल्यानंतर २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान महामार्गावरील वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
17:40 (IST) 24 Oct 2025

Kirit Somaiya : मालेगाव जन्म दाखला घोटाळा…किरीट सोमय्या यांनी जुनीच 'टेप' वाजवली

शहरात ४ हजारावर अर्जदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विलंबाने जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून आदेश मिळवले. ...वाचा सविस्तर
17:07 (IST) 24 Oct 2025

पुणे : दिवाळीत ६८ ठिकाणी आगीच्या घटना

दिवाळीत (नरक चतुर्दशी ते भाऊबीज) शहरातील वेगवेगळ्या भागांत आग लागण्याच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर आग लागण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी लागलेल्या आगी किरकोळ स्वरूपाच्या होत्या. ...वाचा सविस्तर
16:56 (IST) 24 Oct 2025

दिवाळीत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; रोकड, दागिन्यांसह ४२ लाखांचा ऐवज लंपास

नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई, कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, तसेच हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या. ...सविस्तर वाचा
16:51 (IST) 24 Oct 2025

ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरील प्रवाशांना जीवघेणे ठरणारे फलक हटविले, पुलाचे विद्रुपीकरण केल्यास फौजदारी गुन्हे

ठाकुर्ली पुलावर कोणीही बेकायदा फलक लावले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिला आहे. ...अधिक वाचा
16:43 (IST) 24 Oct 2025

ठाणे : दुर्ग बांधणी स्पर्धेत शिवरायांच्या लढाईतील चलचित्रांचा समावेश

दिवाळी सण म्हटलं की किल्ले बांधणी करणे हे समीकरण पूर्वीपासून चालत आले आहे. विविध गावांमध्ये अजूनही दिवाळीच्या आधी किल्ले साकारण्याची, ते सजवण्याची परंपरा कायम आहे. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 24 Oct 2025

२० वर्षे ग्रामपंचायत सदस्य; तरीही मतदारयादीतून नावाचे रहस्यमय स्थलांतर!

कोंढाळीतील २० वर्षे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या संजय राऊत यांच्या नावाचे मतदारयादीतून रहस्यमय स्थलांतर झाल्याने खळबळ; अनिल देशमुख यांनी याला “लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप” ठरवत सखोल चौकशीची मागणी केली. ...अधिक वाचा
16:28 (IST) 24 Oct 2025

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, भात शेती आडवी 

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीसाठी तयार झालेली भाताची कणसे आडवी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. ...वाचा सविस्तर
16:28 (IST) 24 Oct 2025
"ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का?", रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल

"मंत्र्यांचं ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मंत्र्यांचे सिडको, रॅपिडो, पत्ते, डान्सबार, हनी ट्रॅप, गुंडांसोबतची सलगी, बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले निकटचे संबंध आदी ‘पराक्रम’ बघितले तर या ऑडिटमध्ये अनेक मंत्री सरकारची Assets बनण्याऐवजी Liability बनलेत, हे सांगायला खरं तर कुठल्याही ऑडिटरची गरज नाही. तरीही ऑडिट करणारच असाल तर हा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करणार का? आणि ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून घरचा रस्ता दाखवणार का? हेही स्पष्ट झालं पाहिजे", अशी खोचक टीका रोहित पवारांनी महायुती सरकारवर केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:28 (IST) 24 Oct 2025

जिवंतपणी स्वच्छता दूत… जग सोडताना देवदूत.. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अवयवदानातून…

चंद्रमणी जामगडे (६६), रा. बिडगाव, ता. कामठी, जि. नागपूर हे नागपूर महानगरपालिकेतील माजी सफाई कर्मचारी होते. ...सविस्तर वाचा
16:18 (IST) 24 Oct 2025

नागपूरहून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण… वाहतूक कोंडीवर… नितीन गडकरी म्हणाले…

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ...वाचा सविस्तर
16:16 (IST) 24 Oct 2025

यंदाच्या दिवाळीत सोन्यापेक्षा चांदी खरेदीला सर्वाधिक पसंती

यंदाच्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत सोने -चांदीच्या दरात वाढ झाल्याने सोने -चांदी खरेदीसाठी ग्राहक हात आकडता घेतील असे वाटले होते. ...सविस्तर बातमी
16:15 (IST) 24 Oct 2025

डोंबिवलीत फडके रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोटार मालकाला वाहतूक पोलिसांची नोटीस

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील बापूसाहेब फडके रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एक मोटार बेवारस स्थितीत उभी आहे. ...वाचा सविस्तर
16:10 (IST) 24 Oct 2025

नागरिकांकडून २६ बंदुका पोलिसांच्या स्वाधीन, गडचिरोली पोलिसांच्या नागरी कृती उपक्रमाला मोठे यश

गडचिरोलीत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी २६ भरमार बंदुका स्वेच्छेने जमा केल्या; नक्षलवाद कमी होत असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ होत असल्याचे दिसते. ...वाचा सविस्तर
15:59 (IST) 24 Oct 2025

Video: खुर्ची एक, अधिकारी दोन! थेट पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरींसमोरच एकमेकिंशी भिडल्या दोन महिला अधिकारी

सतराव्या रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. देशभरासह नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदींनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संदेशही दिला. ...वाचा सविस्तर
15:59 (IST) 24 Oct 2025

Video: सत्ताधारी आमदारांना 'डिफेन्डर' कार भेट देणारा ठेकेदार कोण? हर्षवर्धन सपकाळ म्हणतात लवकरच महाराष्ट्राला कळेल…

बुलढाण्यातून सुरु झालेला महागाड्या व शाही 'डिफेन्डर' वाहनाचा वाद आता राज्यात पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेन्डर वाहनावरून मोठा गौप्यस्फ़ोट केला आहे. ...सविस्तर बातमी
15:55 (IST) 24 Oct 2025

छत्रपती संभाजीनगर : संघ कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; रा. स्व. संघ मुर्दाबादच्या घोषणा

Vanchit Bahujan Aghadi March Against RSS : आरएसएस कार्यालयावरचा हा पहिला मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. ...सविस्तर बातमी
15:53 (IST) 24 Oct 2025

ठाण्यातील या शाळेचे विद्यार्थी युरोपात झळकणार; विज्ञानासोबत संस्कृतीचाही जागतिक प्रसार

ठाण्यातील एका इंग्रजी माध्यम शाळेच्या तीन विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक प्रकल्प आता थेट युरोपपर्यंत पोहोचला आहे. शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट वे टू चेक कार्बन इमिशन कॉज बाय व्हेहिकल्स’ या प्रकल्पाची निवड झाली आहे. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 24 Oct 2025

दीपोत्सवात मराठीच्या सांस्कृतिक पैलूंची उधळण, 'माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅन्व्हास'च्या दिवाळी पहाटला रसिकांची पसंती

संत, महात्म्यांपासून ते आताच्या आधुनिक काळात झालेला, होत असलेला मराठी भाषेचा विकास या कार्यक्रमात आहे. ...सविस्तर वाचा
15:43 (IST) 24 Oct 2025

Woman Doctor Suicide Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. ...अधिक वाचा
15:22 (IST) 24 Oct 2025

अबब… जळगावमध्ये भरिताची वांगी १०० रूपये किलो !

जळगाव जिल्ह्यात प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटल्याने भरिताची वांगी आताच १०० रूपये प्रति किलोने विकली जात आहेत. ...अधिक वाचा
15:19 (IST) 24 Oct 2025

नीलेश घायवळचे पारपत्र रद्द; पोलिसांच्या पत्रानंतर पारपत्र कार्यालयाची कारवाई

पुणे पोलिसांनी घायवळचे याचे पारपत्र रद्द करण्यासाठी पारपत्र कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानंतर पारपत्र कार्यालयाने त्याचे पारपत्र रद्द केले, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. ...सविस्तर बातमी
15:06 (IST) 24 Oct 2025

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन; सरकारला दिली झुणका भाकरीची शिदोरी

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षाकडून काळी दिवाळी आंदोलन पुकारण्यात आले. ...सविस्तर बातमी
15:02 (IST) 24 Oct 2025

पिंपरीत दिवाळीमध्ये दररोज १५०० टन कचरा

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घटांगाडीमार्फत संकलित केला जातो. मोशीतील कचरा डेपो येथे हा कचरा टाकला जातो. शहरात दरराेज ओला आणि सुका असा सरासरी १३०० टन कचरा संकलित केला जातो. मात्र, दिवाळीत कचऱ्यात भर पडते. ...वाचा सविस्तर
14:54 (IST) 24 Oct 2025

दिवाळीत वाहन खरेदीला ‘वेग’ गेल्यावर्षीपेक्षा वाहनांची अधिक विक्री; इलेक्ट्रिक वाहने खरेदी घसरली

यावर्षी दिवाळीच्या आठवडाभरामध्ये ठाणे शहरात नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा वाढलेला कल यामुळे वाहन खरेदी वाढल्याचे वाहतुक तज्ज्ञ सांगतात.असे असले तरी इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत रोडावले आहे. ...वाचा सविस्तर
14:38 (IST) 24 Oct 2025

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिराला मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाचा ‘लूक’, नुतनीकरणासाठी शासनाकडून १५ कोटीचा निधी प्राप्त

कल्याण डोंबिवली पालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर नुतनीकरण, पुनर्विकास आणि सुशोभिकरण करण्याच्या हालाचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. ...सविस्तर बातमी
14:21 (IST) 24 Oct 2025

नाशिकहून पुण्याला बसने जाणाऱ्या प्रवाशांनी हे लक्षात घ्यावे…

दिवाळीच्या सुट्या लागल्यावर मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमधून नोकरदार, कामगारवर्ग आपआपल्या गावी जाऊ लागतात. ...सविस्तर बातमी
14:08 (IST) 24 Oct 2025

यात्रेत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार

बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून नराधम आरोपी कैलास सूर्यभान आत्राम ( २८, रा. आवळगाव, ता. मारेगाव) यास पोलिसांनी अटक केली. ...सविस्तर वाचा
13:37 (IST) 24 Oct 2025

Gold-Silver Price : सोने, चांदीत आणखी मोठी पडझड… जळगावमध्ये आता ‘इतका’ दर !

दिवाळीसारख्या मोठ्या सणानंतर भारतात सोने आणि चांदीची खरेदी मंदावली असून, यामुळे या मौल्यवान धातूंवरील मागणीत लक्षणीय घट दिसून येत आहे. ...सविस्तर वाचा

maharashtra news live

‘मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी…’, धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)