मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन, त्यानंतर उपोषण, सरकारशी अनेक फेऱ्यांमध्ये केलेली चर्चा, निवडणूक लढवण्याची घोषणा आणि शेवटी माघार अशा अनेक गोष्टींमुळे मनोज जरांगे पाटील कायमच चर्चेत राहिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून त्यांनी ऐन वेळी घेतलेली माघार राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांसाठी कारणीभूत ठरली. तरी जरांगे पाटील वेगवेगल्या भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. लासलगावमध्ये अशाच एका संवादादरम्यान त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री त्यांनी अचानक माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे उमेदवारांची पंचाईत झाली. त्यांनी अर्ज माघारीही घेतले. पण यामुळे जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. निवडणुकीत कुणाला पाडायचं, कुणाला जिंकवायचं यासंदर्भात त्यांनी केलेली विधानंही चर्चेत आल्यानंतर आता त्यांनी “मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा” हे केलेलं विधान मराठा समाजासाठी चिंतेचा विषय ठरलं आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”
amaltash movie
सरले सारे तरीही…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

शरीर मला साथ देत नाही – मनोज जरांगे पाटील

लासलगावमध्ये मराठा समाजातील लोकांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीसंदर्भातील त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत केलेलं विधान कार्यकर्त्यांची चिंता वाढवणारं ठरलं आहे. “मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये, माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी माझी इच्छा आहे”, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

“मला दर ८-१५ दिवसांनी सलाईन लावावी लागते. मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय. कारण हे शरीर आहे. कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हे मलाही सांगता येत नाही. माझं शरीर कधी धोका देईल सांगता येत नाही. मी उपोषणं केली आहेत. त्या उपोषणांमुळे मला चालताना, उतरताना-चढतानाही त्रास होतो”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तर्क-वितर्क केले जाऊ लागले आहेत.

Story img Loader