राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीतून होते. खासदार उदयनराजेंनी महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा दिल्लीत बसून राज्यपालांचा निर्णय घ्यायला केंद्र सरकारला भाग पाडावे असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिला आहे. राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीत होत असते. त्यामुळे महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीत जावे आणि राज्यपालांविषयी निर्णय घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावला.

हेही वाचा- “ज्यांनी महापरिनिर्वाण दिनाला कधी बॅनर लावले नाहीत, ते…”; वंचित-ठाकरे गट बैठकीवरून दिपक केसरकरांची खोचक टीका

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सातारा पालिकेत जाऊन घरपट्टी पालिकेकडून नियमबाह्यारीत्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू असून ही अन्यायकारक कर आकारणी त्वरीत थांबवावी यासाठी प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांबाबत सर्वांनीच जपून बोलले पाहिजे. अपमान, अवमान होईल अशी वक्तवे करू नयेत. इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सगळ्याच पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बोलण्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे भाजप मधील ज्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत, त्यांना योग्य समज देतील.

हेही वाचा- छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही? काँग्रेसचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपाल यांनी केलेल्या वक्त्यव्यावरून त्यांना बदलावे अशी मागणी होत आहे, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ते प्रयत्न सुरू ठेवले आहेत. फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे व जनतेच्या भावना जाणारे नेते आहेत. राज्यपाल बदलाची प्रक्रिया ही केंद्रातून होत असते, राज्य सरकारच्या अखत्यारीत हा विषय नाही. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन बसावे. तेथून हालचाली करून राज्यपालांना बदलावे. साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यात काय अर्थ आहे, असा टोला त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.