NCP Leader महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत १२ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. खरंतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट कौटुंबिक होती. त्याकडे मात्र राजकीय दृष्टीने पाहिलं जातं आहे. राजकीय वर्तुळात अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुण्यातले बडे नेते यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का ? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तसंच या बाबत रोहित पवारांची आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हटलं आहे सुनंदा पवार यांनी?
अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, असेही सुनंदा पवार म्हणाल्या. “मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या. आता याच प्रश्नाबाबत पुण्यातले शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे ( NCP Leader ) यांनीही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा- Sanjay Raut : शरद पवार गटाचे पाच खासदार फोडून घेऊन या असं ‘यांना’ सांगितलंय- संजय राऊत
काय म्हणाले अंकुश काकडे?
“१२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस दिल्लीत साजरा झाला. शरद पवार हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. तर अजित पवार हे त्यांच्या कामानिमित्त दिल्लीला होते. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी. वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवारांना अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशा काही बातम्या आहेत. कार्यकर्त्यांचीही ही भावना आहे की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. आता सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच झालं तर आनंदाची गोष्ट असेल.” असं अंकुश काकडेंनी ( NCP Leader ) म्हटलं आहे.
राष्ट्रवादीबाबतचा निर्णय शरद पवार घेतील
दरम्यान अंकुश काकडे पुढे म्हणाले की असं सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP Leader ) म्ह शरद पवार पक्ष यांचा निर्णय शरद पवार घेतील. शरद पवार नेमका कुठला निर्णय घेतील ते सांगता येणार नाही. त्यांनी अजित पवारांसह जुळवून घेण्याचा निर्णय घेतला तर स्वागतच होईल. तसंच त्यांनी तसा निर्णय घेतला नाही तरीही त्यांच्या निर्णयाच्या पुढे कुणी जाणार नाही. त्यांना कुणीही विरोध दर्शवणार नाही असंही अंकुश काकडे ( NCP Leader ) म्ह म्हणाले.