स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे किरण माने यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येत त्यांची भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने आणि स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.

जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत किरण माने आणि सतीश राजवाडे दोघेही उपस्थित होते. या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“किरण मानेप्रकरणी स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे यांच्याशी चर्चा केली. त्यांना फक्त मी एकच प्रश्न विचारला की, किरण मानेंना कधी समज देण्यात आली होती का? तसे काही पुरावे आहेत का? पुरावे आता बनवता येतील. पण मेल पाठवला आणि रिसीव्ह झाला हा मुख्य मुद्दा आहे. जर आता स्टार प्रवाह प्रोडक्शन हाऊसला आता विचारु शकतं तर यात स्टार प्रवाहही यामध्ये आहे. त्यामुळे एखाद्या कलाकाराला असं तडकाफडकी कोणताही विचार न करता बाहेर काढणे हा माणुसकीच्या विरोधातील निर्णय आहे. त्या मालिकेतील सर्व प्रमुख स्त्री कलाकारांनी किरण मानेंची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळे किरण मानेंवर संशय घ्यायला मला तरी कुठेही जागा दिसत नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“किरण मानेंवर अन्याय झाला हे स्पष्ट दिसत आहे. तरी देखील याच्या खोलात जाण्याचा निर्णय झाला आहे. आता स्टार प्रवाहचे प्रमुख सतीश राजवाडे यांनी प्रोडक्शन हाऊसच्या माणसांना घेऊन येतो असे सांगितले आहे. त्यावेळी आपण चर्चा करु, असा आज निर्णय झाला,” असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

सर्वांनी एकत्र बसावं आणि तिढा सोडवावा – जितेंद्र आव्हाड

“या मालिकेतील सर्व स्त्री कलाकारांनी किरणची बाजू घेतली आहे. एका स्त्रीने आरोप केला आणि बाकीच्या कलाकारांनी त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे कुठेही कसलाही रंग न लावता चॅनल, प्रोडक्शन हाऊस या सर्वांनी एकत्र बसावं आणि हा तिढा सोडवावा. यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका चॅनलने घ्यावी,” असा सल्लाही आव्हाडांनी यावेळी दिला.

“सतीश राजवाडेंनी आज काहीही माहिती नाही अशी भूमिका घेतली. किरण माने हे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुंबईत लढायला आलेला तो मुलगा आहे. तो फार प्रसिद्ध आहे. ते घराघरात प्रसिद्ध आहेत. ज्यांना अशाप्रकारे काढलं जातं, त्यांच्यावर काय बितलं असेल हे किती वेदना देऊन जाते, याचा आपणही विचार करायला हवा. एका बैठकीत गुंतलेल्या प्रकरणाचा निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा चर्चा करणार आहोत. हे प्रकरण लवकर मिटावं, हीच माझी भूमिका आहे. ही एक चांगली मालिका आहे. या मालिकेला महाराष्ट्रात फार प्रोत्साहन मिळालं होतं,” असेही त्यांनी म्हटले.