scorecardresearch

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण

लसीचे दोन डोस घेतलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण
(संग्रहित फोटो)

गेल्या काही दिवसांपासून करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी करोनाचा धोका काही टळलेला नाही. आता लसीचे दोन डोस घेतलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

“करोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. करोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

दुसरीकडे देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ करोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या