scorecardresearch

Premium

“धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

NILESH RANE AND UDDHAV THACKERAY
निलेश राणे आणि उद्धव ठाकरे (संग्रहित फोटो)

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले असून यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गट तसेच भाजपावर घणाघाती टीका केली. याच मुलाखतीवर बोलताना भाजपाचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेली मुलाखत म्हणजे फुटलेला पेपर सोडवणे आहे, असे निलेश राणे म्हणाले. तसेच धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही. लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका, अशी बोचरी टाकीही राणे यांनी केली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >> आमदार, खासदारांनंतर एकनाथ शिंदेंचा मोर्चा ज्येष्ठ नेत्यांकडे? लिलाधर डाके यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

prashant jagtap marathi news, sharad pawar marathi news
“साहेब आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका, तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला”, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे शरद पवार यांना साकडे
Chief Minister Ajit Pawar NCP karyakarta Urges Prioritize Party Organization
‘आधी पक्षसंघटन मग मुख्यमंत्री पद’, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले!
ambadas danve in pimpri chinchwad
….ही तर आयुक्तांची मग्रुरी, मनमानी कारभार शिवसेना नीट करेल!; अंबादास दानवे संतापले
thane mp shrikant shinde, shrikant shinde on ulhasnagar firing case
“कोण काय म्हणतो यापेक्षा सीसीटिव्ही फुटेजमधून सत्य लोकांसमोर…” खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची गोळीबार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

“मी पाहिलेली मुलाखत स्क्रिप्टेड आहे. ही मुलाखत म्हणजे फुटलेला पेपर सोडवणे होय. या मुलाखतीत संजय रातऊतांनी पत्रकारितेच्या कौशल्यातून प्रश्न विचारले आणि या प्रश्नींची थेट उत्तरे उद्धव ठाकरे यांनी दिली असे काहीही नाही,” असे निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा >> महाराष्ट्रात सत्तांतर होणार म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “त्यांना स्वप्नातच…”

तसेच, शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना नियती कोणालाही सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आयुष्यभर मजा मारली, असे निलेश राणे म्हणाले. “आता उद्धव ठाकरे शाखेपर्यंत (शिवसेना शाखा) आले आहेत. त्यांनी याआधी शिवसेनाभवन, मातोश्रीच्या खाली कधी पाहिले नाही. शिवाजी पार्कच्या पलीकडे कधी ते सभा घ्यायचे नाही. या माणसाला आता शाखेमध्ये यावे लागले. ही नियती आहे. नियती कोणालाही सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आयुष्यभर मजा केली. पण आता बस झालं. मजा मारण्याचा त्यांचा कोटा पूर्ण झाला,” असे निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा >> नागपुरातील धक्कादायक घटना; १२ वर्षाच्या मुलीवर नऊ जणांकडून सामूहिक बलात्कार

“उद्धव ठाकरे त्यांच्या जगातून बाहेर येत नाहीत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रश्न आता कोर्टात आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. पण धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही. ते स्वत:च म्हणत आहेत की सगळे बाण निघून गेले. आता ते रिकामटेकडे धनुष्य घेऊन बसले आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंना शोभायचे. यांना लॉलिपॉप वगैरे असं काहीतरी देऊन टाका. उद्धव ठाकरेंना ते शोभेल,” असे निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा >> मुख्यमंत्री शिंदेना भेटीसाठी दिल्लीतील श्रेष्ठींनी वेळ दिली नसावी, कारण… – अजित पवार

पुढे बोलताना निलेश राणे यांनी संजय राऊतांवरही टीका केली. “संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते आजारी आहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात काही ठिकाणी जाऊन भाषण करत आहेत. या भाषणात ते गेलेल्या माणसांना गद्दार म्हणत आहेत. लोकांना गद्दार म्हटल्यानंतर तुम्ही योद्धा होत नाहीत. तुम्हाला सिद्ध करावं लागतं,” असा टोला निलेश राणे यांनी लगावला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nilesh rane criticizes uddhav thackeray and sanjay raut on interview and bow and row logo prd

First published on: 28-07-2022 at 14:02 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×