सांगली : औरंगाबाद व उस्मानाबादचे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामंतरास विरोध करणार्‍या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सांगलीत निषेध तर मिरजेत एमआयएमच्यावतीने प्रतिमेला दुग्धाभिषेक करीत समर्थन करण्यात आले.

शासनाने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशिव  केले आहे. मात्र, या नामांतराविरूध्द खा.जलील यांनी गेले सहा दिवस आंदोलन सुरू केले आहे. याचा आज सांगलीत जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. आंदोलन स्थळी औरंगजेबाचे समर्थन केले जात असून हे कृत्य देशद्रोही असून या प्रकरणी खा. जलील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा >>> “कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे, आज मात्र…”; शरद पवारांची भाजपावर टीका; सांगितला कृषीमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये माजी आ. नितीन शिंदे, प्रसाद रिसवडे, गजानन हुलवान,  श्रीकांत शिंदे, उदय मुळे, रवि वादवणे आदी उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ खा. जलील यांच्या समर्थनार्थ  प्रतिआंदोलन केले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह खा. जलील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव अस्लम मुा, मिरज शहराध्यक्ष सद्दाम जमादार, निलेश वायदंडे, मयूर हत्तीकर, इजाज आगलावणे, प्रताप चव्हाण, ओम पाटील, रोहित व्हनखेडे, आसिफ मुतवी आदी सहभागी झाले होते.