रत्नागिरी :कोकण मार्गावर धावणारी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या पावसाळ्यात फे-या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सद्या कोकण रेल्वे मार्गावर वनदे भारतच्या सहा फे-या चालविल्या जातात, त्या आता तीन फे-या चालविण्यात येणार आहेत.

सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात यावी, अशी कोकण विकास समितीने मागणी केली होती. या सुपरफास्ट एक्स्प्रेसला अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

कोकण मार्गावर धावणारी २२२२९/२२२३० क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात ३ दिवस चालविण्यात येते. मात्र ही एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस चालवण्यासाठी कोकण विकास समितीने आग्रह धरला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य होणार नसल्याचे स्पष्ट करत एक्स्प्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर परतीच्या प्रवासात मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीनच दिवस धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

११०९९/१११०० क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्स्प्रेर ड्यातून मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार
११०९९/१११०० क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ४ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार शुक्रवार व रविवारी तर परतीच्या प्रवासात शनिवारी व सोमवार धावणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२११९/२२१२० क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस सोमवार आणि गुरुवार बगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळवार, गुरुवार व शनिवार तर परतीच्या प्रवासात बुधवार, शुक्रवार व रविवार अशी धावणार आहे.