अलिबाग – किल्ले रायगडावर सोमवारी तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे . यासाठी हजारो शिवप्रेमी आजपासूनच रायगडावर दाखल झाले आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. शेकडो हात यासाठी कामाला लागले आहेत. रायगडावरील मेघडंबरी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली आहे.

राज सदरेवरील मेघडंबरी

विविध फुलांचा वापर करून  सजवण्यात आली आहे. झेंडू, अष्टर, शेवंती, ऑर्किड अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे. किल्ल्यावर ठिकठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. जवळपास ७ ते ८ फुलांचा वापर यात करण्यात आला आहे.

गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राजसदरेवर तुलादान करण्यात आले.  शिवराज्याभिषेकाच्या पुजाविधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शिवप्रतिमेची या वेळी तुला करण्यात आली.  खाद्य पदार्थ, ड्रायफुड, शालेय शैक्षणिक साहित्य आदीचे तुलादान यावेळी करून त्याचे वाटप करण्यात आले. होळीच्या माळावर विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर  करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले . स्थानिक आखाड्यांनी पारंपारिक लेझिम कला सादर केली.  भगवे झेंडे, पताका, फेटे , छत्रपतींचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले उपस्थित आहेत. ६ जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता तर आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.