News Flash

‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये अभिषेक- इलियाना?

अनुरागने स्वत: या सिक्वलची पटकथा लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणार आहे.

इलियाना डिक्रूझ, अभिषेक बच्चन

चार वेगवेगळ्या शहरांमधील चार कथा एकत्र करत ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा अनुराग बासू दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता जवळपास ११ वर्षांनंतर त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी करिना कपूर आणि अर्जुन कपूर ही जोडी निश्चित करण्यात आली. त्यानंतर राजकुमार रावच्या नावाचीही चर्चा होती. आता अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूझ यांचीही सिक्वलमध्ये वर्णी लागल्याचं कळतंय.

अनुराग आणि इलियाना यांच्यात चांगली मैत्री आहे. ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलसाठी त्याने विचारलं असता इलियानाने लगेच होकार कळवला. तर अभिषेकनंही भूमिकेसाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे दोघांकडून तोंडी होकार मिळाल्यानंतर आता फक्त लिखित करार बाकी आहे.

वाचा : शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार खुशी कपूर 

या सिक्वलमध्ये नेमक्या किती कथा असणार याबाबत अनुरागने अद्याप माहिती दिली नाही. तरी अभिषेक आणि इलियाना ही नवीन जोडी पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटासाठी इतक्या कलाकारांच्या तारखा जुळवणं अत्यंत कठीण काम असतं असं ट्विट अनुरागने केलं होतं. त्यामुळे यात आणखी कोणाकोणाच्या भूमिका असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अनुरागने स्वत: या सिक्वलची पटकथा लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणार आहे. पहिल्या भागात शिल्पा शेट्टी, कंगना रणौत, कोंकणा सेन शर्मा, शायनी आहुजा, शरमन जोशी, इरफान खान, धर्मेंद्र, के.के. मेनन , नसीफा अली अशी अनेक बड्या कलाकारांची मांदियाळी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 4:05 pm

Web Title: abhishek bachchan and ileana dcruz roped in for life in a metro sequel
Next Stories
1 Video : अडचणींमध्येही प्रेम खुलवणारं ‘सुई धागा’ मधलं पहिलं गाणं प्रदर्शित
2 हृतिकच्या फ्लर्टला वैतागून दिशाने सोडला चित्रपट?
3 ‘गरज असताना साऱ्यांनीच पाठ फिरवली’
Just Now!
X