06 July 2020

News Flash

अभिषेक, जॉन अब्राहम ‘हेरा फेरी ३’ साठी सज्ज

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा 'हेरा फेरी ३' या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसणार आहेत.

| January 12, 2015 05:20 am

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसणार आहेत. याआधी दोस्ताना या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले होते. फिरोज नाडियादवाला यांच्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱया सिक्वलमध्ये जॉन-अभिषेक काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर या दोघांनीही ‘हेरा फेरी-३’साठी काम करणार असल्याची पुष्टी दिली आहे.
हेरा फेरी ३ चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज वोरा करणार असून यामध्ये सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्याही मुख्य भुमिका असणार आहेत. तसेच ‘हेरा फेरी’चा सिक्वल असलेल्या ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटाची कथा जेथे संपली होती तेथूनच ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या कथेची सुरूवात होणार असल्याचेही समजते. मात्र, यावेळी अक्षय कुमार या सिक्वलमध्ये असणार नाही. चित्रपटाचे चित्रीकरण येत्या जून महिन्यात सुरू होण्याचे अपेक्षित असून ते मुंबई, दुबई आणि लास वेगास येथे होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2015 5:20 am

Web Title: abhishek bachchan and john abraham team up for hera pheri 3
टॅग John Abraham
Next Stories
1 मैं शमिताभ!
2 २१ वा वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा
3 बीपी लैंगिक शिक्षणाचा उफराटा धडा
Just Now!
X