बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने करोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. करोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे आठ ऑगस्ट रोजी त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाला. मात्र घरी पोहोचताच अभिषेकने पुन्हा एकदा करोनाशी पंगा घेतला आहे. त्याने एक गंमतीशीर कार्टून पोस्ट करुन करोनावर मात केल्याचं सांगितलं आहे.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मा यांना करोनाची लागण?; व्हिडीओद्वारे दिली खरी माहिती

प्रसिद्ध कार्टूनिस्ट मनोज सिन्हा यांनी अभिषेकसाठी एक कार्टून स्केच तयार केलं होतं. करोनाविरोधात लढताना अभिषेकला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी हे कार्टून तयार केलं होतं. याच कार्टूनचा एक फोटो अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या स्केचमध्ये अभिषेक ले पंगा म्हणत करोनाला आव्हान देताना दिसत आहे. त्याची ही गंमतीशीर पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – सतीश शाह यांची करोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

करोनाची लागण झाल्यानंतर अभिषेकवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.