अभिनेता आणि निर्माता अजय देवगण याची निर्मिती असलेला पार्श सिनेमा २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राधिका आपटेची मुख्य भूमिका आहे. लीना यादवने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गुजरात राज्यातील ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळावर हा सिनेमा भाष्य करतो. यात चार सर्वसामान्य महिला राणी, लाजो, बिजली आणि जानकी यांच्यातल्या आंबट गोड नात्यांचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. अजयने ट्विट करुन या सिनेमाची तारीख सांगितली. आतापर्यंत २४ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वांमध्ये १८ अवॉर्ड्स या सिनेमाला मिळाले आहेत. हा सिनेमा २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून पार्शचा ट्रेलर नऊ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. राधिका आपटेशिवाय या सिनेमात आदिल हुसैन, सुरवीन चावला, तनिष्ठा चॅटर्जी आणि सयानी गुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
दरवर्षी ‘टीआयएफएफ’कडून ६० देशांतून सुमारे ३०० सिनेमांना आमंत्रण देण्यात येतं. त्यात ‘पार्श’ सिनेमाचाही समावेश करण्यात आहे. लीना यादव म्हणाल्या की, ‘एवढ्या मोठ्या चित्रपट महोत्सवामध्ये पार्शचा समावेश झाल्याने आमच्यासाठी ही एक सन्मानाची गोष्ट आहे.’ या सिनेमाची कथा तीन सर्वसामान्य महिला जुन्या प्रथांना भेद देऊन जगायला सुरुवात करतात.
पार्शबद्दल बोलताना अजय म्हणाला की, ‘सिनेमाची कथा महिल्यांच्या लढ्याची आहे. जी त्यांनी लढली पाहिजे आणि त्यात जिंकलेही पाहिजे. असे सिनेमे बनले गेले पाहिजे, बघितले गेले पाहिजेत आणि अशा सिनेमांची चर्चाही झाली पाहिजे.’
Presenting PARCHED…18Awards, 24 Intl. film festivals across continents. Releasing 23rd Sep Trailer on 9th Sep. pic.twitter.com/tsxiU778qE
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 4, 2016