बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कधीकधी तर त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. अभिनेत्री अमिषा पटेल देखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते. पण नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.
अमिषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाल्कनीमध्ये उभी आहे. दरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये ती हॉट दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले होते. पण नेटकऱ्यांनी तिला या लूकमुळे ट्रोल केले आहे.
एका यूजरने ‘आंटी या वयातही इतकी फिट आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तू इतकी सुंदर आहेस तरी देखील तुला चित्रपट का मिळत नाही’ असे म्हटले आहे.
४४ वर्षांची अमिषा आज चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे देखील सांगताना दिसते. तसेच ती बिग बॉस १३ मुळे देखील चर्चेत आली होती.