बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ‘पिकू’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात प्रचंड व्यस्त आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. चित्रपट प्रसिद्धी कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींकडून उपस्थित कलाकारांवर अनेकवेळा चित्रपटाव्यतिरिक्त इतर अनेक प्रश्नांचा मारा होताना दिसतो. ‘पिकू’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात नेमका हाच धागा पकडून एका प्रश्नाला उत्तर देताना बिग बींनी पुढील जन्मी पत्रकार होण्याची इच्छा बोलून दाखवली. सततच्या प्रश्नांना उत्तरे देऊन आता आपण थकलो असून, पुढील जन्मी आपल्याला पत्रकार होण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2015 रोजी प्रकाशित
पुढच्या जन्मी पत्रकार होण्याची बिग बींची इच्छा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'पिकू' या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात प्रचंड व्यस्त आहेत.

First published on: 05-05-2015 at 06:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan in next birth wants to become journalist