04 June 2020

News Flash

अमिताभ, सलमान, इरफान सर्वोत्कृष्ट कोण?

अमिताभ बच्चन, सलमान खान आणि इरफान खान यांच्यात युद्ध सुरु झाले आहे.

'बिग स्टर एन्टरटेंमेन्ट' या पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी तिनही अभिनेत्यांमध्ये रेस लागली आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अमिताभ बच्चन, सलमान खान आणि इरफान खान यांच्यात युद्ध सुरु झाले आहे. आता तुम्ही म्हणाल हे तिनही अभिनेते त्यांच्या कामात चोखंदळ आहेत. आता यांच्यात कसली चुरस लागणार. तर येत्या ‘बिग स्टर एन्टरटेंमेन्ट’ या पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी यांच्यात रेस लागली आहे.
अमिताभ, सलमान आणि इरफान हे तिघेही सदर पुरस्काराकरिता नामांकित झाले आहेत. अमिताभ यांना ‘पिकू’ चित्रपटात साकारलेल्या वडिलांच्या भूमिकेकरिता नामांकित करण्यात आले आहे. तर बॉलीवूडचा प्रेम म्हणजेच सलमानला ‘प्रेम रतन धन पायो’साठी नामांकन मिळालेय. इरफान हादेखील ‘पिकू’साठी नामांकित करण्यात आला आहे.
दुसरीकडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोण (पिकू), कंगना रणौत (तनू वेड्स मनू रिटर्न्स), प्रियंका चोप्रा (दिल धडकने दो) आणि सोनम कपूर (प्रेम रतन धन पायो) यांच्यात चुरस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2015 12:57 pm

Web Title: amitabh bachchan salman khan irrfan khan in race for best actor trophy
Next Stories
1 नव्या युगाची ‘& जरा हटके गोष्ट’
2 छातीत दुखू लागल्याने शंकर महादेवन रुग्णालयात दाखल
3 चेन्नई पूरग्रस्तांना शाहरुखची एक कोटीची मदत
Just Now!
X