01 March 2021

News Flash

‘तिला पहिले..’, मुलीच्या बॉलिवूडमधील पदार्पणावर अनुराग म्हणाला

अनुरागने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

सध्या बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप वादग्रस्त विधानांनमुळे चर्चेत आहे. तो सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधताना दिसत आहे. तसेच कंगना देखील त्याला सडेतोड उत्तर देण्यात मागे नाही. त्या दोघांमध्ये घराणेशाही या विषयावरुन वाद सुरु असताना अनुरागला एका मुलाखतीमध्ये मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने तिला पहिले स्वत:ला मेहनत घेऊन ऑडिशन देऊन एखादी भूमिका मिळावावी लागेल असे म्हटले आहे.

अनुराग कश्यपने नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. दरम्यान अनुरागला त्याची मुलगी आलियाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘जर आलियाला अभिनेत्री व्हायचे असले तर तिला त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. एखादी भूमिका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल’ असे म्हटले आहे.

‘तिने तिचे करिअर निवडायला हवे. पण निश्चितपणे तिला खूप काही शिकायला हवे. एक दिवस अचानक उठून मला अभिनेत्री व्हायचे आहे असे ती म्हणू शकत नाही. जर तिला हे करायचे असेल तर तिला त्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी ऑडिशन द्यावी लागेल. ऑडिशन देऊन एखादी भूमिका मिळावावी लागेल’ असे अनुराग पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 2:04 pm

Web Title: anurag kashyap on whether he would launch his daughter aaliyah in bollywood avb 95
Next Stories
1 “पुरस्कार द्या अन्यथा बहिष्कार टाकेन”; करण जोहरने समिक्षकांना दिली होती धमकी
2 निक-प्रियांकाच्या घरी चिमुकलीचं आगमन
3 ‘कपिल शर्मा शो’च्या पहिल्याच भागात होणार सोनू सूदची एण्ट्री?
Just Now!
X