22 September 2020

News Flash

VIDEO : ‘डॅडी’मध्ये वाहणार गणेशोत्सवाचे वारे

'कोई देवा कहे कोई चिंतामणी...'

डॅडी

गॅंगस्टर, गँगवॉर यावर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड यशस्वी ठरतात. त्यामुळे हेच सूत्र कायम ठेवत दिग्दर्शक अशिम अहलुवालिया अशीच एक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. मायानगरी मुंबईमध्ये एकेकाळी गुंडगिरीचं मोठं प्रस्थ होतं आणि त्या प्रस्थामध्ये असं एक नाव समोर आलं ज्याने गुन्हेगारी जगतात एक वेगळीच दहशत निर्माण केली. ते नाव होतं अरूण गवळी म्हणजेच डॅडीचं. अरुण गवळीच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून, अभिनेता अर्जुन रामपाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणारल आहे. अशा या चित्रपटातील आणखी एक गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं.

मुंबईमध्येच आकारास येणाऱ्या कथानकाचा अंदाज घेत दिग्दर्शकाने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. योगायोग म्हणजे अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सवाची रंगत ‘डॅडी’च्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका अर्थी बाप्पाच्या गाण्यांमध्ये आणखी एका गाण्याची भर पडली असंच म्हणावं लागेल.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

‘आला रे आला गणेशा’ असे बोल असणारं हे गाणं साजिद- वाजिद या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं असून, वाजिदने ते गायलं आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांचा मेळ या गाण्यातून साधण्यात आलाय. मुख्य म्हणजे एकिकडे गणेशोत्सवाचा उत्साह, बाप्पाची आरती, श्रद्धेने गणरायाचरणी नतमस्तक होणारे भक्त आणि दुसरीकडे शहरामध्ये सुरु असणारं गँगवॉर असं एकंदर चित्रीकरण या गाण्यात करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक वेगळीच मुंबई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 5:55 pm

Web Title: bollywood actor arjun rampal starrer movie daddy song aala re aala ganesha ganesh chaturthi playlist watch video
Next Stories
1 ‘साहो’साठी प्रभासला मिळालं ‘बाहुबली २’पेक्षा जास्त मानधन?
2 … म्हणून दिव्यांकाला मुलीचं मातृत्त्व नकोय
3 ‘या’ अटीवर करिनाने सैफशी बांधली लग्नगाठ
Just Now!
X