News Flash

या अभिनेत्रीला तैमुरसोबत जायचंय डेटवर

सेलिब्रिटीसुद्धा तैमुरचे चाहते

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा चिमुरडा तैमुर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तैमुरच्या कपड्यांपासून ते खेळण्यांपर्यंत सर्व गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीसुद्धा तैमुरचे चाहते आहेत. त्याचे स्टारडम कोणा सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नुकतंच एका अभिनेत्रीने तैमुरसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘पिंक’ फेम तापसी पन्नू आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही इच्छा बोलून दाखवली. या मुलाखतीत तिला तिचं रिलेशनशिप स्टेटस विचारलं असता, मी सिंगल आहे असं ती म्हणाली. त्यावर इंडस्ट्रीतील कोणत्या व्यक्तीला तुला डेट करायला आवडेल असा सवाल तिला केला गेला. यावर थोडा विचार करत ती म्हणाली, ‘हममम… बॉलिवूड? मी तैमुरला डेटवर घेऊन जाऊ शकते का?’ तिचं हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्येही हशा पिकला.

वाचा : जॉन सीनाही म्हणतोय, ‘अपना टाइम आएगा’

तापसी सध्या तिच्या आगामी ‘बदला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी पुन्हा एकदा बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 3:43 pm

Web Title: can i take taimur out on a date asks this actress
Next Stories
1 गेम ऑफ थ्रोन्समध्ये लोकाग्रहास्तव आर. आर. मार्टिनची एंट्री
2 Women’s Day 2019 : मराठी कलाकारांचा स्त्रीशक्तीला सलाम
3 जॉन सीनाही म्हणतोय, ‘अपना टाइम आएगा’
Just Now!
X