News Flash

‘संजू’ची आतुरतेने वाट पाहणारी ‘ती’ आहे तरी कोण?

चित्रपटाच्या टीमकडून रोज नवनवीन पोस्टर शेअर केले जात असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे.

संजू

बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेला अभिनेता संजय दत्त ‘संजू’ या आगामी चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटातून संजय दत्तच्या जीवनाचा प्रवास उलगडला जाणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाच्या टीमकडून रोज नवनवीन पोस्टर शेअर केले जात असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे. आता या उत्सुकतेमध्ये आणखी एका खास व्यक्तीची भर पडली आहे. ही खास व्यक्तीदेखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येते.

चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याबाबत अभिनेत्री दिया मिर्जा ही फारच उत्सुक असल्याचे दिसून आले. ज्वेलरी डिझाइनर फराह खान अलीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये दियाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. या चित्रपटामध्ये दिया मिर्जा संजय दत्तची पत्नी मान्यता हिच्या भूमिकेत पहायला मिळेल.

‘संजू’ हा चित्रपट लवकरात लवकर पडद्यावर यावा ही आमची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे आता आणखी वाट पहाणे अशक्य आहे. परंतु चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल आणि आमची संपूर्ण टीम यावेळी एकत्र असेल’, असे दियाने सांगितले.

दरम्यान, रणबीर कपूरबरोबरच या चित्रपटामध्ये अनेक मान्यवर कलाकारांची वर्णी लागल्याचे पहायला मिळते. यात संजयची आई नर्गिस यांची भूमिका मनिषा कोईराला साकारत आहे. मनिषा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असली तरी तिला मिळालेली ही एक उत्तम संधी असल्याचे तिने स्वत: सांगितले. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये मनीषा कोइराला, अनुष्का शर्मा, परेश रावल, सोनम कपूर, तब्बू यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:28 pm

Web Title: can not wait to start sanjus promotion mirza
Next Stories
1 …जेव्हा भान हरपून श्रद्धा, राजकुमार नाचतात
2 इंग्रजी मालिका : सबकुछ प्रियांका
3 बक्षिसाच्या रकमेचं शिल्पा काय करणार? तिचा ‘मास्टर प्लान’ ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल
Just Now!
X