सिनेसृष्टीत स्त्रियांसोबत होणाऱ्या लैंगिक गैरव्यवहारावर अनेकदा आवाज उठवला गेला आहे. आजवर तापसी पन्नू, तनुश्री दत्ता, राधिका आपटे, कंगना रनौत यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी ‘#मी टू’ या चळवळी अंतर्गत आपले कास्टिंग काउचचे अनुभव सांगितले आहेत. परंतु अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने मात्र बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींसोबत कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही असं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड हवेत”; टायगर श्रॉफच्या कथित प्रेयसीचा व्हिडीओ व्हायरल

नेमकं काय म्हणाली चित्रांगदा?

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदाने तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “बॉलिवूडमध्ये स्त्रियांचे लैगिक शोषण केले जाते असे आरोप अनेकदा केले जातात. काही प्रमाणात हे खरं आहे. परंतु सरसकट सर्वच निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता या प्रवृत्तीचे असतात असं नाही. मला देखील असे काही अनुभव आले आहेत. परंतु ज्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाही त्यांना मी नकार देते. परिणामी माझ्या हातातून अनेक मोठे चित्रपट गेले आहेत. मात्र या क्षेत्रात कोणीही जबरदस्ती करत नाही. जे काही होते ते दोघांच्या संमतीनेच होते. हा माझा अनुभव आहे. प्रत्येक अभिनेत्रीचा अनुभव हा वेगळा असु शकतो.”

सर्वाधिक वाचकपसंती – ‘या’ भारतीय गाण्यानं केला विक्रम; १२ दिवसांत मिळवले ५ कोटी व्हूज

चित्रांगदा सिंग बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. येत्या काळात ती ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान करत आहे. ‘बॉब बिस्वास’मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे.