News Flash

सलमानच्या न्यायालयीन प्रकरणांना समर्पित वेबसाईटविरुद्ध तक्रार दाखल

सलमान खानने नुकतीच आपल्या न्यायालयीन खटल्यांबाबतची www.salmankhanfiles.com वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर त्याच्या हिट अॅण्ड रन खटल्यासंदर्भातील सर्व माहिती पुरविली जात आहे.

| July 8, 2013 03:06 am

सलमान खानने नुकतीच आपल्या न्यायालयीन खटल्यांबाबतची www.salmankhanfiles.com वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर त्याच्या हिट अॅण्ड रन खटल्यासंदर्भातील सर्व माहिती पुरविली जात आहे. सदर वेबसाइटमुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली आहे. हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सलमानवर अद्याप सदोष मनुष्यवधाचा खटला सुरु असताना त्याने न्यायालयीन कार्यवाहीसंबंधी माहिती पसरविण्यासाठी इंटरनेटचा वापर कसा केला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सलमानच्या या कृत्यामुळे न्यायालयीन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे पाटील म्हणाले आहेत.
सलमानच्या न्यायालयीन प्रकरणांना समर्पित वेबसाईट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 3:06 am

Web Title: complaint filed against salman khan for posting case info online
Next Stories
1 अलका रडणार नाही
2 प्रियांका चोप्रा करणार आंतरराष्ट्रीय मिल्कशेकचे अनावरण
3 नाटकावरून मराठी चित्रपट
Just Now!
X