सध्या करोना व्हायरचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. अशातच तेलुगू चित्रपट निर्माता दिल राजूने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. त्याने रविवारी रात्री निजामाबाद येथील व्यंकटेश्वर मंदीरात लग्न केले आहे. या लग्नसोहळ्याला मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.
४९ वर्षीय दिल राजूच्या दुसऱ्या लग्नाची तयारी मुलगी हंसिता रेड्डीने केली होती. २०१७मध्ये दिल राजूच्या पहिल्या पत्नीचे, अनिताचे निधन झाले होते. हैद्राबादमध्ये तिचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले होते. आता दिल राजूने तेजस्वीनीशी दुसरे लग्न केले आहे. पण तेजस्वीनी ही कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरद्वारे दिल राजूच्या लग्नाची माहिती दिली असून त्याच्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
Wishing Tollywood Ace Producer #DilRaju garu and #Tejaswini a Happy Married life.. 🙂 pic.twitter.com/TNCFgfq8M1
— Ramesh Bala (@rameshlaus) May 11, 2020
दिल राजूने तेलुगू चित्रपटसृष्टीमधील अनेक चित्रपटांची निर्माती केली आहे. तसेच त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. दिल राजूने सुपरस्टार पवन कल्याणसोबत ‘वकिल साब’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट ‘पिकू’ या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 7:58 pm