News Flash

फर्स्ट लूक: जॉन आणि संभावनाचे ‘वेलकम बॅक’मधील टपोरी आयटम सॉंग

अनिस बाझमीच्या 'वेलकम बॅक' या चित्रपटातील टपोरी आयटम सॉंगचे चित्रिकरण नुकतेच पार पडले.

| October 17, 2013 05:59 am

अनिस बाझमीच्या ‘वेलकम बॅक’ या चित्रपटातील टपोरी आयटम सॉंगचे चित्रिकरण नुकतेच पार पडले. बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आलेल्या संभावना सेठसोबत जॉन अब्राहमने या गाण्यावर पाय थिरकवले आहेत. ‘मैं बबली हुई, तू बंटी हुआ’ हे गाणं अनू मलिक यांनी गायलं असून गणेश आचार्य यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

आपल्या भूमिकेशी समरस झालेला जॉन यावेळी लाल रंगाचा शर्ट, जॅकेट आणि डेनिम जीन्समध्येच सेटवर वावरताना दिसत होता. त्याला भरीस भर म्हणून संभावना सेठ लाल रंगाची चोळी आणि शॉर्ट स्कर्टमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.
जॉन अब्राहमने नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या ‘शूटआऊट अॅट वडाळा’ या चित्रपटात सन्नी लिओन आणि सोफी चौधरी यांच्यासोबत अनुक्रमे ‘लैला’ आणि ‘मन्या आला रे’ या गाण्यांवर नृत्य केले होते.

या गाण्यासाठी जॉन अब्राहमचा ३० फूटी कटआऊट तयार करण्यात आला होता आणि त्याचा गाण्यात प्रॉपर्टी म्हणून वापर करण्यात आला आहे. जवळपास सात दिवस ७०० ज्युनिअर आर्टीस्टसोबत मुंबईमध्ये या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले.    
वेलकम बॅक चित्रपटात जॉनसोबत अनिल कपूर, श्रृती हसन, नाना पाटेकर, परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला ऑगस्ट २०१३ मध्ये सुरूवात झाली आहे.

(बॉलीवूड हंगामा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2013 5:59 am

Web Title: first look john abrahams tappori item song in welcome back
Next Stories
1 फ्रिडा पिंटोचा ‘पोल डान्स’
2 ‘लग्नाची’ हुकमी गोष्ट
3 चांगल्या कामाचे चांगले फळ
Just Now!
X