06 July 2020

News Flash

‘पीके’चा चौथा पोस्टरही प्रदर्शित; आमिर आणि संजुबाबा बँडवाल्याच्या पोशाखात

बॉलिवूडच्या आगामी 'पीके' या बहुचर्चित चित्रपटाचे मोशन पोस्टर मंगळवारी प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच, आमिरने ट्विटरवरूनच 'पीके'चे चौथे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

| September 17, 2014 01:31 am

बॉलिवूडच्या आगामी ‘पीके’ या बहुचर्चित चित्रपटाचे मोशन पोस्टर मंगळवारी प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच, आमिरने ट्विटरवरूनच ‘पीके’चे चौथे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यापूर्वीच्या पोस्टरवर आमिर खान पोलिसांच्या तर संजय दत्त बँडवाल्याच्या पोशाखात पहायला मिळाले होते. मात्र, नवीन प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर हे दोघे जण बँडवाल्यांचा पोशाखात दिसत आहेत. हे पोस्टर प्रदर्शित करताना आमिरने पुन्हा एकदा आपल्या भैरोसिंह या मित्राची ओळख करून दिली असून, त्याला भैय्या म्हणत असल्याचेदेखील आमिरने ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.

 

प्रमोशनच्या या आगळ्यावेगळ्या तंत्रामुळे ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटात आमिर खानबरोबर अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे आणखी सहा पोस्टर्स प्रदर्शित होणार असून, येत्या १९ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2014 1:31 am

Web Title: fourth pk poster out now aamir khan and sanjay dutt both as bandwaalas
Next Stories
1 ‘हॅपी न्यू इयर’मधील ‘लव्हली’ गाण्यात दिसणार दीपिकाची हॉट अदा
2 .. अखेर ‘पीके’च्या चित्रीकरणास ‘ओके’
3 ‘पीके’ चित्रपटाच्या तिसऱ्या पोस्टरवर आमिरसोबत संजुबाबादेखील!
Just Now!
X