News Flash

‘आर्मी ऑफ द डेड’मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये एण्ट्री; दमदार ट्रेलर रिलीज

सोशल मीडियावरून व्यक्त केला आनंद

(photo- you tube/screengrab/netflix)

‘महारानी’ या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री हुमा कुरेशी चांगलीच चर्चेत आली आहे. या सिनेमातील हुमाचा लूक आणि अंदाज प्रेक्षकांना आवडला असून हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यातच आता हुमाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या सिनेमातून हॉलिवू़डमध्ये एण्ट्री करतेय. जॅक स्नायडर दिग्दर्शित ‘आर्मी ऑफ द डेड’ चा धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. या सिनेमात झोंबी वॉर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात हुमा गीता नावाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हुमाची एक झलक पाहायला मिळतेय. या सिनेमात झोंबींपासून शहराला वाचवण्यासाठी पुकारलेलं युद्ध पाहायला मिळणार आहे. यासाठी काही तरुणांची फौज झोंबीं विरुद्ध लढण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. हुमा या फौजेतील एक तरुणी आहे. त्यामुळे या सिनेमात तिचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळू शकतो.

अ‍ॅक्शन, ड्रामा आणि थरार या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनुभवायला मिळतोय. तर या सिनेमात मोठी स्टार कास्ट आहे. हुमाने या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ” या हुशार व्यक्तीच्या कल्पकतेचा एक छोटासा भाग बनण्याचा अभिमान आहे. जॅक स्नायडरची मी कायम चाहती आणि मैत्रिण आहे.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे आणि या सिनेमाच्या टीममध्ये सहभागी होता आल्याचा आनंद तिने व्यक्त केलाय.

माधुरी दीक्षित सोबत नोरा फतेहीचे ठुमके!; एकाच मंचावर दोन डान्सिंग क्विन

हुमाच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. हुमा कुरेशी लवकरच अक्षय कुमारसोबत बेलबॉटम या सिनेमातही झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 3:02 pm

Web Title: huma qureshi hollywood entry in zack snyders army of the dead trailer release kpw 89
Next Stories
1 ‘माझ्याशी पंगा घेऊ नका’, रुबिनाचा फोन नंबर लीक होताच पती संतापला
2 महाराष्ट्रात संचारबंदी पण तरीही पाहायला मिळणार ‘या’ मालिकांचे नवे भाग…..जाणून घ्या कारण!
3 आलिया भट्टची करोना चाचणी नेगेटिव्ह; फोटो शेअर करत म्हणाली…
Just Now!
X