लिओनार्दो दा विंची हे जागतिक ख्यातीचे चित्रकार होते. त्यांचे मोनालिसा हे चित्रही गाजले. या चित्राची चोरी झाली होती. याच चोरीवर आधारित एक सिनेमा येतो आहे. जोडी फॉस्टर या हॉलिवूड अभिनेत्रीने या सिनेमाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. १९११ मध्ये मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले होते. या चोरीवर आधारीत हा सिनेमा असणार आहे. द डेलिमेलने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. २८ तासांसाठी हे चित्र चोरीला गेलं होतं. याच चोरीवर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

The Day They Stole the Mona Lisa या पुस्तकावर हा सिनेमा आधारीत असेल असं जोडी फॉस्टरने म्हटलं आहे. मोनालिसाचं हे चित्र पॅरीसमधून चोरीला गेलं होतं. इटलीच्या तिघांनी हे चित्र चोरलं. अत्यंत शिताफीने ही चोरी करण्यात आली होती. या चित्राला लावण्यात आलेल्या सुरक्षा फ्रेमसह हे चित्र चोरण्यात आलं होतं. एका सबवेतून हे चित्र अत्यंत चलाखीने पळवण्यात आलं. या संदर्भात The Day They Stole the Mona Lisa हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. या पुस्तकानेच आपल्याला या प्रसंगावर सिनेमा बनवण्याची प्रेरणा सुचली असल्याचं जोडी फॉस्टरने म्हटलं आहे.

काय आहे या चित्राचं वैशिष्ट्य?

१६ व्या शतकात लिओनार्दो दा विंची या चित्रकाराने काढलेले हे चित्र आहे. हे एक तैलचित्र आहे. एक विचार करणारी स्त्री आणि तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हे या चित्राचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या प्रसिद्ध चित्रांपैकी हे एक चित्र आहे. असंही सांगितलं जातं की फ्लोरेन्स येथील एका व्यापाऱ्याच्या पत्नीला पाहून लिओनार्दो द विंची यांना या चित्राची प्रेरणा मिळाली. हे चित्र काढण्यासाठी त्यांना चार वर्षांचा कालावधी लागला होता. हे मूळ चित्र २१ इंच लांब आणि ३० इंच रुंद आहे. या चित्राचं जतन करण्यासाठी एका विशिष्ट काचेत ते ठेवण्यात आलं आहे. ही काच न चमकणारी आणि न तुटणारी आहे. सध्या हे चित्र पॅरीसमधल्या संग्रहालयातच ठेवण्यात आलं आहे. या चित्रात दाखवण्यात आलेल्या मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं हसू हे अजूनही न उलगडलेलं गूढ आहे.

अत्यंत ऐतिहासिक महत्त्व असलेल्य याच चित्राची चोरी १९११ मध्ये झाली होती. याच संदर्भात आता एक सिनेमा येतो आहे ज्याचं दिग्दर्शन जोडी फॉस्टरने करणार आहे.