News Flash

‘जितके प्रेम पाकिस्तान मधून मिळाले..’,अक्षयचा जुना व्हिडीओ शेअर करत केआरकेने साधला निशाणा

केआरकेने सोशल मीडिवर अक्षयचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

केआरकेने सोशल मीडिवर अक्षयचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून कमाल आर खान हा सतत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाना साधताना दिसतो. यावेळी केआरकेने बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारवर निशाना साधला आहे. केआरकेने एक व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारवर देशभक्त असं म्हणतं टोला लगावला आहे.

आणखी वाचा : ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा

केआरकेने त्याच्या केआरके बॉक्सऑफिस या ट्विटर अकाऊंटवरून अक्षयचा हा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. “पाकिस्तानमध्ये माझे जे चित्रपट प्रदर्शित झाले, ते सगळ्यात जास्त कमाई करतात. जितके प्रेम पाकिस्तान मधून मिळाले तितके मला कधी दुसरीकडून मिळाले नसेल,” असे अक्षय त्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतो. हा व्हिडीओ शेअर करत “आपला देशभक्त कॅनेडियन अभिनेता अक्कीचे पाकिस्तानबद्दलचे विधान!”, असे कॅप्शन देत केआरकेने अक्षयला टोला लगावला आहे.

आणखी वाचा : ३२ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खान करणार पहिल्यांदाच बायोपिक?

दरम्यान, या आधी केआरकेने सलमानवर केलेल्या चुकीच्या आरोपांमुळे सलमानच्या टीमने त्याच्यावर मानहानीचा दावा केला आहे. सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड ‘बिंग ह्युमन’ हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत असा आरोप केला, त्यामुळे केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे, असे सलमानच्या टीमने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 6:32 pm

Web Title: krk attacks akshay kumar shares old video of akshay kumar saying jitna pyaar mujhe pakistan se milta hai dcp 98
Next Stories
1 ‘ओके कंप्यूटर’चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर!
2 “काही तरी वेगळं येतंय…अंदाज लावा”, फोटो शेअर करत कार्तिक आर्यनने चाहत्यांना टाकलं कोड्यात
3 बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी जॅकलिनने खरेदी केले १७५ कोटी रुपयांचे घर?
Just Now!
X