02 March 2021

News Flash

‘लवयात्री’ फ्लॉप झाल्यानंतर आयुषचं सलमानच्या पावलावर पाऊल

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला चित्रपट 'लवयात्री' बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला.

सलमान खान, आयुष शर्मा

बॉलिवूडमध्ये अनेकांसाठी ‘गॉडफादर’ ठरलेल्या अभिनेता सलमान खानने त्याच्या मेहुण्यालाही चित्रपटात लाँच केलं. मेहुणा आयुष शर्माने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्याची जबाबदारी ‘भाईजान’ अर्थात सलमानने आपल्या खांद्यावर घेतली होती. पण आयुषचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. तरीसुद्धा या अपयशाने न खचता आता आयुषने जबरदस्त पुनरागमन करण्याची तयारी केली आहे. सलमानच्या पावलावर पाऊल टाकत आयुष आता एका अॅक्शनपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘डीएनए’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आयुषच्या या दुसऱ्या चित्रपटाच्या निर्मितीचीही जबाबदारी सलमानच घेणार आहे. आयुषचं अभिनय सलमानला आवडल्याने त्याला दुसरी संधी देण्याचा विचार त्याने केला आहे. म्हणूनच यावेळी रोमॅण्टिक नव्हे तर एका अॅक्शनपटातून तो आयुषला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर सलमान आणि आयुष काम करत आहेत.

वाचा : आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मोडले हे सहा बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

पहिला प्रयोग फसल्यानंतर आता आयुषचा दुसरा चित्रपट आणि अॅक्शन अंदाज तरी प्रेक्षकांना भावतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आयुष शर्मा हा सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे. २०१४ मध्ये आयुष आणि अर्पिताचं लग्न झालं. दोघांना २ वर्षांचा एक मुलगा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2018 7:48 pm

Web Title: loveyatri actor aayush sharma is all set to sign an action packed movie with salman khan films
Next Stories
1 भाऊ कदमने साफसफाई कर्मचाऱ्यांना मदत करत साजरी केली दिवाळी
2 ‘फुगडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मोडले हे सहा बॉक्स ऑफीस रेकॉर्ड
Just Now!
X