बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारे कपल म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. आजकाल हे कपल फारसं एकत्र पाहायला मिळत नाही. पण गुरुवारी अभिनेता चंकी पांडेच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये दोघांनीही पुन्हा एकत्र हजेरी लावली होती. त्यांच्या या हजेरीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण मिळाले आहे.
गुरुवारी चंकी पांडेने एक ग्रॅन्ड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. चंकी पांडेच्या आमंत्रणाचा मान ठेवत मलायका आणि अर्जुन एकत्र पार्टीला गेले असल्याचे पाहायला मिळाले. त्याच बरोबर पार्टीला जाताना त्या दोघांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचंही पाहायला मिळाल आहे.
मलायकाने २०१७ मध्ये पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन १९ एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. तसेच लग्नासाठी केवळ मलायका आणि अर्जुनचे निकटवर्तीयच उपस्थित राहणार असून या यादीत करिष्मा, करिना, दीपिका, रणवीर या कलाकारांचा समावेश असल्याचे म्हटले जात होते. दोघेही ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. परंतु मलायकाने या सर्व चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 6:39 pm