News Flash

‘माझ्यासाठी प्रेम बनलंच नाही, हे सत्य मी स्वीकारलंय’- मनीषा कोइराला

मी या वयात आहे की प्रेम आणि नातेसंबंधांमुळे दुःख सहन करण्याची ताकद नाही

अभिनेत्री मनिषा कोईराला

मनीषा कोईराला सध्या संजय दत्तचा बायोपिक संजी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात मनीषाने संजयच्या आईची म्हणजेच नर्गिस यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान मनीषा म्हणाली की, आता तिला पुन्हा प्रेमात पडायचे नसून करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.

sanju संजू, sanju

मनीषा म्हणाली की, ‘आता मी या वयात आहे की प्रेम आणि नातेसंबंधांमुळे दुःख सहन करण्याची ताकद नाही. जगण्याची दुसरी संधी मिळाली असताना यापुढचे संपूर्ण आयुष्य मला करिअरसाठीच द्यायचे आहे.’ यावेळी मनीषाने तिच्या आयुष्याचे सत्य सांगताना म्हटले की, तिच्या आजारपणातच मनीषाला जीवनाचं महत्त्व आणि सत्यता कळली. मनीषासोबतचा एक योगायोग म्हणजे मनीषाने कर्करोगाला मोठ्या धीराने लढा दिला. संजू सिनेमात तिने अभिनेत्री नर्गिस यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. स्वतः नर्गिस यांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता.

sanju संजू

मनीषाने संजू सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हटले की, कर्करोगाचे उपचार घेत असताना झालेल्या शारिरीक आणि मानसिक यातना सहन केल्यानंतर पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देणं फार कष्टदायी होतं. पण नर्गिस यांची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली यामुळेच मी हे सारं करण्याचं ठरवलं. येत्या २९ जूनला संजू सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 11:39 am

Web Title: manisha koirala playing nargis in sanju does not want to be in love now
Next Stories
1 Donald Trump Kim Jong Un summit : जाणून घ्या किम जोंगला का सलाम करत आहेत ऋषी कपूर
2 Quantico Row: ‘क्वांटिको’ वादावर प्रियांकाला मिळाली ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची साथ
3 सायना नेहवालच्या हट्टापायी श्रद्धा कपूर अडचणीत
Just Now!
X