News Flash

मैत्री पलीकडच्या नात्याची गोष्ट; ३० जूनला झळकणार ‘जून’ सिनेमा

संवेदनशील कथानक लाभलेल्या 'जून'ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे.

नेहा आणि सिद्धार्थची एक वेगळीच केमिस्ट्री यात पाहायला मिळणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ‘जून इन जून’ च्या चर्चा रंगल्या असताना अखेर ‘जून’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जून महिना संपत आला तरी हा सिनेमा नेमका कधी रिलीज यासाठी प्रेक्षकांसोबतच कलाकारदेखील आतूर होते.

त्यामुळे आपल्या या मित्रमंडळींचा आणि प्रेक्षकांचा मान राखत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी अखेर ‘जून’ चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले असून या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  त्यामुळे अनेक दिवसांची ही प्रतीक्षा आता संपली असून चित्रपटप्रेमी लवकरच प्लॅनेट मराठी ‘जून’ सिनेमावर पाहू शकणार आहेत.

‘हिलिंग इज ब्युटीफुल’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘जून’ या चित्रपटात नेहा पेंडसे – बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं मैत्री पलीकडचं नातं  पाहायला मिळणार आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या ‘जून’ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

हे देखील वाचा: Viral Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे..’, स्टाफकडून सॅण्डल काढून घेतल्याने शहनाज गील झाली ट्रोल

हे देखील वाचा: …म्हणून शाहरुख खान अक्षय कुमारसोबत काम करत नाही; किंग खानने केला होता खुलासा

 

‘जून’ची निर्माती आणि अभिनेत्री नेहा पेंडसे – बायस ‘जून’ विषयी सांगते, ”जून हा नक्कीच पठडीबाहेरील चित्रपट आहे. मला खूप आनंद होतोय, की ‘जून’च्या निमित्ताने सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. निखिल महाजन याने त्याच्या भावना लिहून एक उत्तम काम केले असून त्याच्या भावनांना सुहृद आणि वैभवने जिवंत केले आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकर मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.

‘जून’च्या प्रदर्शनाबद्दल सिद्धार्थ मेनन म्हणतो, ” एक कलाकार म्हणून हा चित्रपट आम्हा सर्वांसाठीच एक टर्निंग पॉईंट आहे. एक कलाकार म्ह्णून अधिक बारकाईने मला ‘नील’च्या भूमिकेकडे बघता आले. प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी साध्यर्म असलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया येतात, आता याकडे आमची उत्सुकता लागली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 4:49 pm

Web Title: neha pendse sidharth menon starter jume marathi movie release on 30 june on planet marathi ott kpw 89
Next Stories
1 ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ना मिळणार छोट्या वादकांची साथ
2 Viral Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे..’, स्टाफकडून सॅण्डल काढून घेतल्याने शहनाज गील झाली ट्रोल
3 फोटो पेक्षा कतरिनाच्या शूजची चर्चा..किंमत ऐकलीत का?
Just Now!
X