नाटक, मालिका, सिनेमांनंतर आता वेब शोला देखील प्रेक्षकांची तेवढीच पसंती मिळत आहे. म्हणून तर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक पाठोपाठ एक वेब शो येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कास्टिंग काऊच’, ‘बापाचा रस्ता’, ‘स्ट्रगलर साला’ असे एक ना दोन अनेक मराठी वेब शो सध्या यूट्युबवर दिसत आहेत. या वेब शोंना प्रेक्षकांची पसंतीही तेवढीच मिळत आहे. भारतीय डिजीटल पार्टीचा ‘कास्टिंग काऊच’ हा शो चांगलाच गाजला. आता भाडिप प्रेक्षकांसाठी नवं काही तरी घेऊन येत आहेत. ‘आपल्या बापाची सोसायटी’ अशा नावाचा नवा वेब शो ते घेऊन येत आहेत. या शोचा पहिला भागही नुकताच प्रदर्शित झाला. ‘आपल्या बापाची सोसायटी’ या वेब शोचे दिग्दर्शन सारंग साठे यांनी केले आहे. विशेष म्हणजे या वेब शोमध्ये अभिनेत्री पर्ण पेठे आणि मुण्मयी गोडबोले झळकणार आहेत.

पर्ण पेठे हिचा नुकताच ‘फोटोकॉपी’, ‘वाय झेड’ हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांतील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तसेच ‘रमा माधव’ या ऐतिहासिक सिनेमातील तिची भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडली होती. अशा वेगवेगळया भूमिकेतून दिसणारी पर्ण आता थेट वेब शोमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘कास्टिंग काऊच’, ‘आपल्या बापाचा रस्ता’ या वेब शोनंतर आता, ‘भाडिप’चा हा पुढचा शो असणार आहे. सध्या वेब शो हे जबरदस्त चालत आहे. त्यांचा प्रेक्षक वर्गदेखील दिवसागणित वाढत चालला आहे. त्यामुळे या वेब शोच्या माध्यमातून या कलाकारांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते यात काही शंका नाही. त्यातही वेब शो पाहणारे प्रेक्षक हे अधिक तर तरुण असल्यामुळे त्यांच्या आहे. ‘आपल्या बापाची सोसायची’ हा वेब शो प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल यात काही शंका नाही.