News Flash

प्रभुदेवाचे ‘मुक्कला मुकाबला’ गाणे पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रुपात

पंचवीस वर्षांपूर्वी 'मुक्कला मुकाबला' या १९९४ च्या तमिळ चित्रपटातील गाण्याने प्रभुदेवाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते.

प्रभुदेवा

पंचवीस वर्षांपूर्वी ‘मुक्कला मुकाबला’ या १९९४ च्या तमिळ चित्रपटातील गाण्याने प्रभुदेवाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. हा चित्रपट हिंदीत ‘हमसे है मुकाबला’ या नावाने प्रदर्शित झाला होता. रेमो डिसुझाच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या चित्रपटासाठी या गाण्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. ए.आर.रेहमानच्या या मूळ चालीवर तनिष्क बागचीने काम केले आहे.

या चित्रपटाच्या दुबई शेड्युलदरम्यान या गाण्याचे चित्रीकरण झाले. शूटिंगदरम्यान अतिशय कठीण स्टेप्स प्रभुदेवाने एकाच टेकमध्ये केल्या. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता वरूण धवन व श्रद्धा कपूरदेखील यावेळी उपस्थित होते. प्रभुदेवाच्या गाण्यावर यांनी देखील गाण्याविषयी असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार म्हणाला की,”९०च्या काळातील या गाण्याने बरेच रेकॉर्ड्स मोडले होते. हे गाणे अजूनही क्लब्समध्ये वाजवले जाते. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे प्रभुदेवा त्याचे नृत्यकौशल्य दाखवतो. या प्रसंगासाठी ‘मुकाबला’ परत आणणे गरजेचे होते. या गाण्याची कोरिओग्राफी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मुळ गाण्याइतकाच या गाण्यालाही प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देतील.”

कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा याने डान्सवर आधारित उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीवर आणले. ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’नंतर आता त्याचा तिसरा भाग ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट येत आहे. यामध्ये पुन्हा एकदा अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. नोरा फतेही, सोनम बजवा, धर्मेश, शक्ती मोहन यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 6:52 pm

Web Title: prabhudeva back with superhit song
Next Stories
1 फराह खान आणणार ‘सत्ते पे सत्ता’चा रिमेक, शाहरुख साकारणार भूमिका?
2 Video : नैना-बनी पुन्हा एकत्र; वॅनिटी व्हॅनमध्ये केला डान्स
3 किर्ती कुल्हारी व ‘तुंबाड’ फेम सोहम शाह करणार एकत्र काम
Just Now!
X