News Flash

RK Studio Fire: आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीने जुन्या जखमा झाल्या ताज्या

या घटनेमुळे जुन्या जखमा ताज्या झाल्या आहेत.

आर. के. स्टुडिओला भीषण आग

प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला आज दुपारी भीषण आग लागली. या घटनेमुळे जुन्या जखमा ताज्या झाल्या आहेत. चार वर्षांपूर्वी कॉमेडियन कपिल शर्माच्या सेटलाही भीषण आग लागली होती. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

आर. के. स्टुडिओत डान्स रिअॅलिटी शोसाठी उभारण्यात आलेल्या ‘सुपर डान्सर’च्या सेटला ही आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी पोहोचले असून या घटनेमुळे चेंबूर नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. इलेक्ट्रिक स्पार्कमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सेटसाठी लागणारे प्लायवूड या भागात असल्याने आग झपाट्याने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. दरम्यान, मुंबईतील एखाद्या स्टुडिओला भीषण आग लागण्याची ही काही पहिलीच दुर्घटना नाही.

वाचा : PHOTOS ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवरून आमिरचा लूक लीक

दोन दिवसांपूर्वीच ‘बेहद’ मालिकेच्या सेटवर आग लागल्याचे वृत्त होते. त्यावेळी अनेरी वजानी आणि कुशल टंडन यांच्या लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरु होते. दोन्ही कलाकार फेरे घेत असताना अनेरीच्या पदराला आग लागल्याचे कुशलने पाहिले. त्याने पदराची आग वाढत जाऊ नये म्हणून पटकन पदराचा तो भाग फाडून टाकला. कुशलने जर योग्य वेळी प्रसंगावधान दाखवले नसते तर आगीने रौद्र रुप धारण करण्यास वेळ लागला नसता, असे सेटवरील एका सूत्राने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीत म्हटले. याआधी काही महिन्यांपूर्वी याच मालिकेच्या सेटवर लग्नाच्या दृश्यादरम्यान आग लागली होती.

त्यावेळी, अर्जुन (कुशल टंडन) आणि माया (जेनिफर विंगेट) यांच्या लग्नाचे चित्रीकरण सुरु होते. जेनिफरला सुरुवातीला हा मालिकेचाच भाग असल्याचे वाटले. पण, कुशलला खरोखरच आग लागल्याचा अंदाज आल्याने त्याने जेनिफरचे प्राण वाचवले. या घटनेत जेनिफरचे प्राण वाचवताना त्याचा हात भाजला होता.

वाचा : कंगनासोबतचा वाद विसरून आदित्य पांचोलीने पाहिला ‘सिमरन’!

२०१४ साली चांदिवली येथील निक्सन स्टुडिओमध्ये आग लागली होती. या स्टुडिओत एकता कपूरच्या ‘ये हैं मोहब्बते’ मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाल्याचे वृत्त होते.

२०१३मध्ये कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या सेटवर भीषण आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, सेट जळल्याने जवळपास २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे तेव्हा वृत्त होते. त्यावेळी कपिलला लता मंगेशकर, शाहरुख खान आणि इतर काही सेलिब्रिटींनी आर्थिक मदत केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 6:29 pm

Web Title: rk studio fire reminds 2014 case when kapil sharmas set caught in fire costs 20 crore
Next Stories
1 PHOTOS : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवरील आमिरचा लूक लीक
2 .. म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी त्याला मानते अशुभ
3 कंगनासोबतचा वाद विसरून आदित्य पांचोलीने पाहिला ‘सिमरन’!
Just Now!
X