26 February 2021

News Flash

Video : सलमानने इशारा करत चाहत्यांना सांगितली ‘ही’ गोष्ट

सलमान खान घरी पोहोचल्याबरोबरच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी सलमानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. यामध्ये कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, प्रभुदेवा यांच्याबरोबरच इतरही अनेकांचा समावेश होता.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानला अखेर जामीन मंजूर झाला आणि मुंबईतील त्याच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर जमलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आपल्या लाडक्या सल्लूभाईला पाहण्यासाठी चाहते अतिशय आतूर झाल्याचे चित्र होते. त्याचे स्वागत करण्यासाठी मुंबईतूनच नाही तर देशभरातून चाहते याठिकाणी जमले होते. त्याच्या जामिनावर सुनावणी असल्याने अनेकांनी सकाळपासूनच त्याच्या घरापाशी हजेरी लावली होती. यावेळी आपल्या सायंकाळी साधारण ८.३० वाजताच्या सुमारास सलमान आपल्या गॅलरीत आला आणि त्याने चाहत्यांना अभिवादन केले. चाहत्यांकडून भरभरुन मिळत असलेल्या प्रेमाबद्दल सलमानच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना होती. यावेळी चाहते त्याच्या घराबाहेरुन जायला तयारच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा आपल्याला खूप झोप आली आहे, त्यामुळे आपण आता झोपणार आहे असे त्याने आपल्या चाहत्यांना खूणेने सांगितले. आपणही सगळ्यांनी जायला हरकत नाही अशीही अॅक्शन त्याने केली.

ही घटना काहींनी कॅमेरात टीपली आणि आपल्या सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ अपलोडही केले. अगदी कमी वेळात हे सगळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सलमानला जोधपूर कारागृहात झोप लागली नव्हती त्यामुळे तो काहीसा थकला होता. त्यामुळेच तुम्ही आता घरी जा कारण मी झोपणार आहे असे सलमान आपल्या चाहत्यांना सांगताना दिसत होता. यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सलमानने आपली लहान बहीण अर्पिताचा मुलगा अहिल शर्मा याला कडेवर घेतले होते. त्याचे वडिल सलीम खान आणि आई सलीमा खानही उपस्थित होते. सलमानचा बॉडीगार्ड शेराही यावेळी उपस्थित होता.

सलमान खान घरी पोहोचल्याबरोबरच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी सलमानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. यामध्ये कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, प्रभुदेवा यांच्याबरोबरच इतरही अनेकांचा समावेश होता. त्याचा पुढील चित्रपट रेस-३ मधील सहकलाकार याठिकाणी उपस्थित होते. काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या सलमानला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला ७ मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, या दोन अटी कोर्टाने सलमानला घातल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 6:36 pm

Web Title: salman khan asked fans to leave as he wants to sleep viral video
Next Stories
1 ऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली तिची आवड-निवड
2 ब्रेकअपनंतरच त्याच्या करिअरला उतरती कळा; कपिलच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा
3 अनुष्का शर्माला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
Just Now!
X