News Flash

लॉकडाउनमुळे शिल्पा शिंदेची झाली ‘अशी’ अवस्था, अभिनय सोडून बांधकाम क्षेत्रात करतेय काम

लॉकडाऊनमुळे शिल्पावर ही वेळ आल्याचं तिने म्हंटलं आहे.

‘भाभाजी घर पर है’ मालिकेतील अंगूरी भाभी भूमिकेतून शिल्पा शिंदेने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली. सध्या शिल्पा ही भूमिका साकारत नसली तरी या भूमिकेमुळे शिल्पाला खरी ओळख मिळाली. त्यानंतर बिग बॉसमधून चाहत्यांची मनं जिकतं शिल्पाने बिग बॉसच्या विजेती पदाचा मान मिळवला होता. मात्र सध्या शिल्पा चर्चेत आली आहे ते म्हणजे व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हिडीओमुळे.

शिल्पा शिंदेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात शिल्पा एका कन्स्ट्रक्शन साइटवर काम करताना दिसतेय. लॉकडाऊनमुळे शिल्पावर ही वेळ आल्याचं तिने म्हंटलं आहे. या व्हिडीओत शिल्पाने डोक्यावर कॅप घातली आहे. तरा हातात मोठं ड्रिलिंग मशीन घेऊन ती काम करताना दिसतेय. मोठ्या मेहनतीने ती ड्रिलिंग मशीनच्या मदतीने खोद काम करताना दिसतेय.

हा व्हि़डीओ शेअर करत शिल्पा कॅप्शनमध्ये म्हणाली, “लॉकडाउन झालं तर मी बांधकाम क्षेत्राकडे वळाले. ज्यांच्याकडे आता काम नाही ते आपलं क्षेत्र बदलू शकतात. काळानुसार सर्व काही ठीक होईल. फक्त पॉझिटिव्ह रहा.” असं ती म्हणाली.

शिल्पाचा हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय. अनेक नेटकरी शिल्पाला ‘सुपर वुमन’ म्हणाले आहेत. तर एक युजर म्हणाला, “तुम्ही ऑलराउंडर आहात. देवाचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहिल.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही खरी शिल्पा शिंदे आहे. एकदम रिअल, जशी आहे अगदी तशी”

आणखी वाचा: “माझ्या सारख्या स्टारसोबत लग्न करशील?”, जेव्हा शाहरुख खानने प्रियांका चोप्राला विचारला प्रश्न!

१९९९ सालामध्ये शिल्पा शिंदेने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मात्र शिल्पाला खरी ओळख ‘भाभीजी घर पर है’ मालिकेमुळे मिळाली. त्यानंतर ती कभी आए ना जुदाई’, ‘संजीवनी’, ‘मिस इंडिया’, ‘मेहर-कहानी हक और हकीकत की’, ‘रब्बा इश्क ना होवे’ या मालिकांमधुन झळकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 1:44 pm

Web Title: shilpa shinde video goes viral as she is working in construction side with drilling machine kpw 89
Next Stories
1 Adipurush: सैफ अली खान आणि प्रभासच्या चित्रपटात ‘मेघनाद’ची भूमिका करणार सिद्धार्थ शुक्ला ?
2 अँजिओप्लास्टीनंतर अनुराग कश्यपचा पहिला फोटो व्हायरल, फोटो पाहून नेटकरी हैराण
3 “माझ्या सारख्या स्टारसोबत लग्न करशील?”, जेव्हा शाहरुख खानने प्रियांका चोप्राला विचारला प्रश्न!
Just Now!
X