News Flash

सोनू सूदच्या नावाने चाहत्याने सुरू केलं मटण शॉप, “मी शाकाहारी आहे” अभिनेत्याची भन्नाट प्रतिक्रिया

ट्विटरवर व्हायरल होणारा व्हिडीओ शेअर करत सोनूने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद करोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. सोनूने करोना काळात मजुरांसह हजारो बेरोजगार तरुणांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आरोग्य सेवा असो किंवा अन्नाची सोय सोनूने वेगवेगळ्या स्वरुपात अनेकांची मदत केली आहे. सोनूची संपूर्ण टीम देशभरात गरजूंच्या मदतीला धावून जातेय. सोनूच्या याच समाज कार्यामुळे देशभरात त्याचे लाखो चाहते आहेत. नुकतच सोनूच्या एका चाहत्याने मटण शॉप सुरू केलं असून या मटण शॉपला त्याने सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनूची भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर एक तेलगू न्यूज व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हि़डीओ तेलंगणामधील असून यात करीम नगर परिसरात सोनू सूदच्या एका चाहत्याने मटण शॉपला सोनूचं नाव दिल्याचं सांगण्यात आलं आहे. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करत मजेशीर प्रतिक्रिया दिलीय. ” मी शाकाहारी आहे. आणि माझ्या नावाने मटण शॉप? मी एखादं शाकाहारी दुकान सुरु करण्यासाठी यांची मदत करू शकतो का?” अशी हटके प्रितिक्रिया सोनूने दिलीय.

आणखी वाचा: “माझ्या सारख्या स्टारसोबत लग्न करशील?”, जेव्हा शाहरुख खानने प्रियांका चोप्राला विचारला प्रश्न!

करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सोनूने नुकतीच आंध्रप्रदेशच्या कुरनूल आणि नेल्लोरमध्ये जून महिन्यात २ ऑक्सीजन प्लान्ट सुरू करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय दररोज सोनूची टीम करोना रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स, औषध आणि अन्य उपयोगी वस्तूंचा पुरवठा करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 3:42 pm

Web Title: sonu sood replies fan on twitter who opens mutton shop after his name said am vegetarian kpw 89
Next Stories
1 लॉकडाउनमुळे शिल्पा शिंदेची झाली ‘अशी’ अवस्था, अभिनय सोडून बांधकाम क्षेत्रात करतेय काम
2 Adipurush: सैफ अली खान आणि प्रभासच्या चित्रपटात ‘मेघनाद’ची भूमिका करणार सिद्धार्थ शुक्ला ?
3 अँजिओप्लास्टीनंतर अनुराग कश्यपचा पहिला फोटो व्हायरल, फोटो पाहून नेटकरी हैराण
Just Now!
X